आयपीएल 2025 ला बराच कालावधी असले तरी, त्याआधी मेगा लिलावाची उत्सुकता वाढत आहे. आतापर्यंत बीसीसीआयने कायम ठेवण्याबाबत नियम जारी केलेले नाहीत. परंतु रेव्ह स्पोर्ट्सच्या अहवालानुसार चेन्नई सुपर किंग्स मेगा लिलावापूर्वी एमएस धोनीला कायम ठेवणार आहे. सीएसकेने पुढील मोसमात कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीत एमएस धोनीचे नाव निश्चितपणे सामील होणार असल्याचे या मीडिया रिपोर्टमध्ये उघड झाले आहे. गेल्या मोसमात त्याने चेन्नईचे कर्णधारपद सोडून ऋतुराज गायकवाडकडे संघाची कमान सोपवली होती.
एमएस धोनीशिवाय ऋतुराज गायकवाड आणि संघाचा माजी कर्णधार रवींद्र जडेजा यांनाही कायम ठेवल्याची बातमी आहे. मेगा लिलावापूर्वी सीएसके अष्टपैलू शिवम दुबेला कायम ठेवण्याकडे लक्ष देत आहे. रिपोर्टनुसार, रिटेन्शन लिस्टमध्ये शेवटचे नाव श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाचे असू शकते. धोनीबद्दल बोलायचे झाल्यास अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीमार्फत रिटेन करण्याची शक्यता आहे. परंतु या संबंधी कोणतीही अधिकृतपणे माहिती अद्याप समोर आलेली नाही.
धोनी मागील हंगामामध्ये बहुतेकवेळा 7 व्या क्रमांकावर किंवा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसला. त्याने संपूर्ण हंगामात एकूण 73 चेंडू खेळले, ज्यामध्ये त्याने 220 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 161 धावा केल्या. धोनीही सामन्यांमध्ये जास्तीत जास्त षटकार मारण्याचा प्रयत्न करताना दिसला. आयपीएल 2024 मध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 37 धावा होती. जी त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध केली होती. दरम्यान त्याची सरासरीही 53 पेक्षा जास्त होती. तर सीएसके गेल्या मोसमात प्लेऑफसाठी पात्र ठरु शकली नाही. गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नईला गुणतालिकेत पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
हेही वाचा-
रिषभ पंतच्या शतकावर ‘खास व्यक्ती’ची प्रतिक्रिया, अवघ्या 3 शब्दात व्यक्त केल्या भावना
Eng vs Aus, चॅम्पियन्स ट्राॅफीपर्वी कांगारुंची ऐतिहासिक कामगिरी; इंग्लंडला
‘मी त्याला पहिले शतक करताना पाहिले’, पंतच्या जोडीदाराने एका ओळीत सांगितली पुनरागमनाची कहाणी