भारताचा माजी फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) समालोचक समितीतून वगळण्यात आले आहे. यानंतर आता आयपीएलमधील संघ चेन्नई सुपर किंग्सने मांजरेकरांना ट्रोल केले आहे.
झाले असे की मागीलवर्षी 2019 विश्वचषकादरम्यान मांजरेकरांनी ‘थोडी थोडी कामगिरी करणारा खेळाडू (बिट्स अँड पीसेस)’, असे जडेजाच्या बाबतीत बोलताना म्हटले होते. त्यावर जडेजानेही ट्विट करत सडेतोड प्रतिउत्तर दिले होते.
जडेजा हा चेन्नई सुपर किंग्स संघातील महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स संघाने मांजरेकरांनी जडेजाबद्दल केलेल्या या टीप्पणीची आठवण यावेळी करुन दिली आहे.
चेन्नईने मांजरेकरांना समालोचकांच्या यादीतून हटवल्यानंतर ट्विट केले आहे की ‘इथून पुढे बिट्स आणि पिसेस मध्ये आवाज ऐकावा लागणार नाही’
मांजरेकरांना बीसीसीआयने समालोचकांच्या यादीतून काढून टाकल्यानंतर ते यंदाच्या आयपीएलमध्येही समालोचन करु शकणार नाहीत. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार दक्षिण आफ्रिका मालिकेच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मांजरेकर धरमशाला येथे उपस्थित नव्हते. याच कारणामुळे मांजरेकर यांची हकलपट्टी झाली असल्याची शक्यता आहे. हा सामना एकही चेंडू न टाकता पावसामुळे रद्द केला गेला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
–रिचर्डसन पाठोपाठ हा क्रिकेटपटूही सुटला कोरोनाच्या कचाट्यातून…
– जडेजाच्या जादूटोण्यामुळे रणजी ट्रॉफी फायनलमध्ये बंगालचा झाला पराभव? पहा व्हिडिओ
– कोरोना इफेक्ट: कॅप्टन कोहलीचा चाहत्यांना खास संदेश