fbpx
Thursday, January 28, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धोनीची सीएसकेतील विकेटकिपरची जागा घ्यायला २४ वर्षीय खतरनाक फटकेबाज तयार

September 16, 2020
in क्रिकेट, IPL, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ Cricketcomau

Photo Courtesy: Twitter/ Cricketcomau


जगप्रसिद्ध अशा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाला कोण ओळखत नाही. सीएसके हा आयपीएलच्या इतिहासातील दूसरा सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी आजवर तब्बल ३ वेळा आयपीएल ट्रॉफी पटकावली आहे. सीएसकेच्या या यशामागे भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा हात आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

धोनी हा संघाचे नेतृत्त्व करण्याबरोबर दमदार फटकेबाजी आणि यष्टीमागे उत्कृष्ट कामगिरी करण्यातही पटाईत आहे. त्याला आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकांमध्ये गणले जाते. अशात धोनीच्या सीएसके संघात दूसऱ्या कोणत्या यष्टीरक्षक फलंदाजाला खेळण्याची संधी मिळणे जवळपास अशक्य आहे. असे असले तरी, देशांतर्गत क्रिकेटमधील एक युवा यष्टीरक्षक फलंदाजाला गेल्या २ वर्षांपासून सीएसकेकडून आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची अपेक्षा करत आहे. हा खेळाडू म्हणजे, तमिळनाडूचा नारायण जगदीशन.

२४ डिसेंबर १९९५ रोजी तमिळनाडूच्या कोईमतूर येथे जन्मलेला जगदीशन हा धुरंदर सलामीवीर फलंदाज आहे. त्याबरोबरच त्याने तमिळनाडू संघाकडून यष्टामागेही उत्कृष्ट भूमिका बजावली आहे. वयाच्या २१व्या वर्षी जगदीशनने देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. ऑक्टोबर २०१६ मध्ये मध्य प्रदेशविरुद्धच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्या सामन्यात जगदीशनने ८ चौकार आणि २ षटकार मारत नाबाद १२३ धावांची अफलातून खेळी केली होती. एवढेच नव्हे तर, तो त्या सामन्यात सामनावीरदेखील ठरला होता.

जगदीशनने आतापर्यंत २३ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४ शतके आणि ४ अर्धशतके ठोकत ११७४ धावा केल्या आहेत. तर, ‘अ’ दर्जाच्या क्रिकेटमधील त्याची कामगिरीही उल्लेखनीय आहे. जगदीशनने २३ ‘अ’ दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १ शतक आणि ५ अर्धशतके केली आहेत. यासह त्याने ७९० धावांची आपल्या खात्यात नोंद केली आहे.

पण, त्याला टी२० क्रिकेटमध्ये जास्त चांगली कामगिरी करता आली नाही. जगदीशनने देशांतर्गत टी२० क्रिकेटमध्ये २२ सामने खेळले आहेत. त्यात त्याची सर्वाधिक धावसंख्या ३५ इतकी आहे. त्याने २३.४६च्या सरासरीने फक्त ३०५ धावा केल्या आहेत. तरीही धोनीच्या सीएसके संघाने आयपीएल २०१८ लिलावात जगदीशनला २० लाख रुपयांना विकत घेतले होते. पण संघात धोनीसारखा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज उपलब्ध असल्यामुळे त्याला अजूनही आयपीएलमध्ये पदार्पण करता आलेले नाही.

परंतु, जगदीशन यंदा खूप फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. त्याने फेब्रुवारी २०२०मध्ये सौराष्ट्रविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात तब्बल १८३ धावांची अफलातून खेळी केली आहे. यात त्याच्या २२ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे.

तर दूसऱ्या बाजूला गेल्या एक वर्षापासून क्रिकेट न खेळलेला धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. याबरोबरच त्याची आयपीएल कारकिर्दही लवकरच संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोनी निवृत्त होण्यापुर्वी आपल्या सीएसके संघासाठी एक दमदार यष्टीरक्षकाचा शोध घेईल, जो त्याची कमी पूर्ण करेल. अशात, जगदीशनला ही संधी मिळवू  शकते. त्यामुळे कदाचित जगदीशनचे आयपीएल पदार्पणाचे स्वप्न यावर्षी तरी पूर्ण होईल.

महत्त्वाच्या बातम्या-

या संघाचा प्रतिभावान खेळाडू म्हणतो, ‘धोनीसारखेच मलाही चांगला फिनिशर बनायचे आहे’

सचिन तेंडुलकरने शेअर केला व्हिडीओ; म्हणाला, माझा नवीन मित्र परत आला आहे

एबी डिविलिअर्सला ‘या’ फलंदाजामध्ये दिसते स्वतःचीच झलक

ट्रेंडिंग लेख-

असे ३ परदेशी खेळाडू, ज्यांचा फॉर्म संघाला देणार आयपीएल विजेतेपद

सहाव्या क्रमांकाचा फलंदाज सलामीवीर बनला आणि इतिहास घडवला

फक्त इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलेल्या क्रिकेटर्सची खास प्लेअिंग ११


Previous Post

८ भाषेत होणार आयपीएलचे प्रक्षेपण, पहा मराठीबद्दल काय झाला निर्णय

Next Post

पॅट कमिन्सने विचारलं युएईत वातावरण कसं आहे; त्यावर या खेळाडूने दिले मजेशीर उत्तर, म्हणाला…

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ englandcricket
क्रिकेट

स्मिथची शिकार केली आता जो रूटचा नंबर; भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकाचे इंग्लंडच्या कर्णधाराला आव्हान

January 28, 2021
Photo Curtsey: Twitter/ICC
क्रिकेट

कागिसो रबाडाचे कसोटी विकेट्सचे ‘द्विशतक’, दिग्गजांच्या मांदियाळीत मिळवली टॉप-५ मध्ये जागा

January 28, 2021
क्रिकेट

“अविवाहित खेळाडूंपेक्षा विवाहित खेळाडूंचे बायो-बबलमध्ये राहणे जास्त अवघड”, ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे भाष्य

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

“धोनीच्या ५ ते १० टक्के जरी खेळलो तरी विशेष आहे”, ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूची प्रतिक्रिया

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

आयपीएल २०२१ च्या हंगामात खेळताना दिसू शकतो अर्जून तेंडुलकर; लिलावासाठी ठरला पात्र

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

भारत-इंग्लंड कसोटी सामन्यांत केवळ ‘या’ दोन खेळाडूंनाच करता आली त्रिशतकी खेळी

January 28, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ KKRiders

पॅट कमिन्सने विचारलं युएईत वातावरण कसं आहे; त्यावर या खेळाडूने दिले मजेशीर उत्तर, म्हणाला...

टी२० विश्वचषक तर आम्ही जिंकणारच, आयपीएलमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटरने व्यक्त केला आत्मविश्वास

Photo Courtesy: iNSTAGRAM/nezm

चाहत्यांची १० वर्षांची मागणी बीसीसीआयने केली पुर्ण, 'ती' यावेळी दिसणार आयपीएलमध्ये

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.