---Advertisement---

फलंदाजांनी चोपलं, गोलंदाजांनी रोखलं! ९१ धावांनी विजय मिळवत चेन्नईने दिल्लीचा प्लेऑफ प्रवास केला खडतर

On: रविवार, मे 8, 2022 11:20 PM
CSK-vs-DC
---Advertisement---

रविवारी (दि. ०८ मे) आयपीएल २०२२मध्ये डबल हेडर सामने खेळले गेले. यातील दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नईने शानदार विजय मिळवला. चेन्नईने दिल्लीला ९१ धावांनी पराभूत केले. या विजयात फलंदाज आणि गोलंदाजांनी मोलाचा वाटा उचलला. डेवॉन कॉनवेला शानदार फटकेबाजीमुळे सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत २०८ धावा केल्या आणि दिल्लीला २०९ धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघाला सर्वबाद फक्त ११७ धावाच करता आल्या. त्यामुळे चेन्नईने हा सामना ९१ धावांनी जिंकला.

चेन्नईच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकडून मिशेल मार्शने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २० चेंडूत २५ धावांचे योगदान दिले. यामध्ये १ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त शार्दुल ठाकूरने २४ आणि कर्णधार रिषभ पंतने २१ धावा चोपल्या. तसेच, मोठमोठ्या खेळी करणारा डेविड वॉर्नरही या सामन्यात फक्त १९ धावाच करू शकला. याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला २ आकडी धावसंख्या गाठता आली नाही.

यावेळी चेन्नईकडून गोलंदाजी करताना मोईन अलीने शानदार कामगिरी केली. मोईनने ४ षटके गोलंदाजी करताना १३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तसचे, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग आणि ड्वेन ब्रावो यांनी २ विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त, महीश तीक्षणाने १ विकेट घेतली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना चेन्नईकडून डेवॉन कॉनवे (Devon Conway) याने अफलातून फटकेबाजी केली. त्याने ४९ चेंडूत ५ षटकार आणि ७ चौकारांसह ८७ धावा चोपल्या. त्याच्याव्यतिरिक्त सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने ४१ धावा, शिवम दुबे याने ३२ धावा आणि कर्णधार एमएस धोनी याने ८ चेंडूत नाबाद २१ धावा केल्या. यावेळी रॉबिन उथप्पाला खास कामगिरी करता आली नाही. तो शून्य धावेवर बाद झाला. या सामन्यात रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) अनफिट असल्यामुळे त्याला संघातून बाहेर बसवले होते. मात्र, याचा संघावर कोणताही फरक पडला नाही.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

यावेळी दिल्लीकडून गोलंदाजी करताना एन्रीच नॉर्कियाने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ४२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त खलील अहमदने २ आणि मिशेल मार्शने १ विकेट घेतली.

चेन्नईविरुद्धच्या पराभवामुळे दिल्ली संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी घसरला आहे. तसेच, चेन्नई संघ आठव्या स्थानी पोहोचला आहे. दिल्लीला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी पुढील तिन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘कशाचा रनमशीन, हा तर डकमशीन’, पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून विराटची खरडपट्टी

वनिंदू हसरंगाचा नाद खुळा विक्रम! बनला ‘अशी’ कामगिरी करणारा बेंगलोरचा दुसरा ‘रॉयल’ खेळाडू

‘इशान- सॅमसन नकोच, टी२० विश्वचषकात फिनिशर म्हणून तोच हवा’, कार्तिकच्या सलग ३ सिक्सनंतर नेटकऱ्यांची मागणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---