Monday, May 16, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कशी नशिबाने थट्टा आज मांडली! आधी जडेजाचं कर्णधारपद गेलं अन् आता संघातूनही केली हाकालपट्टी

कशी नशिबाने थट्टा आज मांडली! आधी जडेजाचं कर्णधारपद गेलं अन् आता संघातूनही केली हाकालपट्टी

May 8, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Ravindra-Jadeja-IPL

Photo Courtesy: iplt20.com


चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. चेन्नईने आतापर्यंत ४ वेळा आयपीएलचा किताब आपल्या नावावर केला आहे. चेन्नईला हे विजेतेपद मिळवून देण्यात अष्टपैलू रवींद्र जडेजा याने मोलाचा वाटा उचलला आहे. मात्र, आयपीएल २०२२च्या हंगामात जडेजाला अपेक्षित कामगिरी करता आली नाहीये. विशेष म्हणजे, या हंगामात चेन्नईचे कर्णधारपद जडेजाकडे सोपवण्यात आले होते. मात्र, पहिल्या ८ सामन्यानंतरच त्याने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे चेन्नईची धुरा पुन्हा एकदा एमएस धोनीकडे आली होती. आता जडेजाच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. कारण, दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात जडेजाला संघातून बाहेर बसवण्यात आले.

रविवारी (दि. ०८ मे) आयपीएल २०२२मधील ५५वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Chennai Super Kings vs Delhi Capitals) संघात खेळण्यात आला. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात चेन्नईने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये २ बदल केले होते. मागील सामन्यात बेंगलोरविरुद्ध खेळणारा रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि ड्वेन प्रिटोरियस (Dwaine Pretorius) यांना या सामन्यात संघातून बाहेर केले.

सुरुवातीला कर्णधारपदाची मोठी जबाबदारी जडेजाकडे सोपवली होती. त्याच्या नेतृत्वात संघाची सुरुवात खराब झाली. चेन्नईला पहिले चार सामने गमवावे लागले. यानंतर संघाने बेंगलोरविरुद्ध खाते उघडले खरे, मात्र पुढेही संघाला सतत विजय मिळवता आला नाही. त्यामुळे जडेजाने ३० एप्रिलच्या सायंकाळी कर्णधारपद धोनीकडे पुन्हा सोपवले. जडेजा चेंडू आणि बॅटसोबतच क्षेत्ररक्षणातही झगडताना दिसला होता. अशात त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करण्यात आले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

धोनीने जडेजाला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करण्यामागील कारणही सांगितले. तो म्हणाला की, जडेजा फिट नाहीये आणि यामुळे तो हा सामना खेळत नाहीये. तरीही तो फिट का नाहीये, किंवा इतर काही समस्या आहेत का? याबाबत धोनीने माहिती दिली नाही.

आयपीएल २०२२मध्ये १६ कोटी रुपयांना चेन्नईने संघात रिटेन केलेल्या जडेजाची हंगामातील कामगिरी पाहिली, तर त्याने १० सामन्यात फलंदाजी करताना १९.३३च्या सरासरीने फक्त ११६ धावा केल्या आहेत. तसेच, गोलंदाजी करताना त्याने ७.५२च्या इकॉनॉमी रेटने फक्त ५ विकेट्स घेतल्या आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘कशाचा रनमशीन, हा तर डकमशीन’, पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून विराटची खरडपट्टी

वनिंदू हसरंगाचा नाद खुळा विक्रम! बनला ‘अशी’ कामगिरी करणारा बेंगलोरचा दुसरा ‘रॉयल’ खेळाडू

‘इशान- सॅमसन नकोच, टी२० विश्वचषकात फिनिशर म्हणून तोच हवा’, कार्तिकच्या सलग ३ सिक्सनंतर नेटकऱ्यांची मागणी


ADVERTISEMENT
Next Post
CSK-vs-DC

फलंदाजांनी चोपलं, गोलंदाजांनी रोखलं! ९१ धावांनी विजय मिळवत चेन्नईने दिल्लीचा प्लेऑफ प्रवास केला खडतर

Kane-Williamson

गोल्डन डकपेक्षाही भयंकर डायमंड डक! आयपीएलमध्ये अशाप्रकारे बाद होणारा केन विलियम्सन सहावा कर्णधार

MS-Dhoni

दिल्लीविरुद्ध २१ धावा चोपताच धोनीच्या नावावर दोन मोठ्या विक्रमांची नोंद, एकात पटकावला थेट अव्वल क्रमांक

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.