---Advertisement---

आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूला पहिल्यांदाच मिळाली तलवार भेट

On: शुक्रवार, सप्टेंबर 18, 2020 4:39 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाचा क्रिकेट मैदानावरील तालवारबाजीचा स्टंट तुम्ही पहिलाच असेल. जेव्हा जेव्हा जडेजा सामन्यात अर्धशतक करतो तेव्हा तो त्याच्या बॅटला तालवारीसारखा फिरवून आनंद साजरा करतो. जडेजाच्या चाहत्यांनाही त्याची ही शैली फार आवडते. तलवार फिरविण्याचा शौक असलेल्या जडेजाला त्याचा संघ चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) भेट म्हणून तलवार दिली आहे.

शनिवारी आयपीएल सुरू होत आहे. आयपीएलचा पहिला सामना सीएसके विरुद्ध मुंबई इंडियन्स दरम्यान खेळला जाईल. दरम्यान चेन्नई संघाने त्यांच्या खेळाडूंना विशेष भेटवस्तू दिल्या आहेत. संघ व्यवस्थापनाने जडेजाला स्मृतिचिन्ह म्हणून तलवार दिली आहे. या स्मृतिचिन्हावर ‘राजपूत बॉय’ असे देखील लिहिले आहे. बरेचदा जडेजा सोशल मिडीयावर छायाचित्रे शेअर करतांना ‘राजपूत बॉय’ लिहायला विसरत नाही.

सुवर्ण रंगाच्या या स्मृतिचिन्हावर जडेजाच्या आयपीएलमधील कामगिरीचे वर्णनही केले आहे. जडेजासाठी खास बनविलेल्या या स्मृतिचिन्हावर लिहिले आहे की आयपीएलमध्ये 100 पेक्षा अधिक बळी मिळवणारा आणि 1900 पेक्षा अधिक धावा काढणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. लीगमध्ये डावखुरा फिरकीपटू म्हणून त्याने सर्वाधिक बळी (108 विकेट) घेतले आहेत.

जडेजाने ट्विटर अकाउंटवर लिहिताना आपल्या फ्रेंचायझी चेन्नई सुपरकिंग्जचे आभार मानले आहे, “हा पुरस्कार दिल्याबद्दल धन्यवाद चेन्नई सुपरकिंग्ज. या महान फ्रेंचायझीसाठी खेळने हा एक सन्मान आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. या हंगामात आणखी चांगली कामगिरी करण्याची मला आशा आहे” असे जडेजाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---