---Advertisement---

इंडियन सुपर लीग: चेन्नईयिनने जमशेदपूरला बरोबरीत रोखले

---Advertisement---

इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) मॅचवीक 14 मधील शनिवारच्या (7 जानेवारी) लढतीत चेन्नईयिन एफसीने जमशेदपूर एफसीला 2-2 असे बरोबरीत रोखले. पिछाडीवरून दोन गोल करताना पाहुण्यांनी यजमानांना विजयापासून वंचित ठेवले. जमशेदपूर येथील जेआरडी टाटा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या रंगतदार सामन्यात दोन्ही संघांनी चांगला खेळ केला. चारपैकी तीन गोल उत्तरार्धात झाले.

पिछाडीवर पडलेल्या चेन्नईयिन एफसीने खेळ उंचावला आणि आघाडी घेतलेल्या जमशेदपूर एफसीला बरोबरीत समाधान मानावे लागले. पहिला गोल करणारा रित्विक दास हा मध्यंतरानंतरही क्लबच्या मदतीला धावला. त्याने 56व्या मिनिटाला संघाला 2-0 असे पिछाडीवर नेले. रिकी लालवरमावमा याने पास केलेल्या चेंडूवर ताबा घेत रित्विकने डाव्या बाजूने गोल क्षेत्रात धडक मारताना प्रतिस्पर्धी संघातील बचावपटूंना चकवत अप्रतिम गोल केला. जमशेदपूरची आघाडी निर्णायक ठरणार, असे वाटत असतानाच 8 मिनिटांमध्ये दोन गोल करताना चेन्नईयिन एफसीने दमदार पुनरागमन केले.

60व्या मिनिटाला व्हिन्सी बॅरेटो याने चेन्नईयिनचे खाते उघडताना आघाडी कमी केली. उजव्या कॉर्नरने केलेला गोल अप्रतिम ठरला. या गोलमुळे पाहुण्यांचा आत्मविश्वास उंचावला. त्यांनी आणखी एक प्रभावी चाल रचली. आकाश संगवानच्या पासवर पीटर स्लिस्कोविकने चेन्नईयिनला 2-2 अशी बरोबरी गाठून दिली. शेवटच्या 22 मिनिटांमध्ये उभय संघांनी आघाडी घेण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, बचावफळीने चोख काम बजावले.

तत्पूर्वी, पूर्वार्ध जमशेदपूर एफसीच्या नावे राहिला. त्याचे क्रेडिट रित्विक दासला जाते. त्याच्यासह संपूर्ण आघाडी फळीच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रतिस्पर्धी चेन्नईयिन एफसीची बचावफळी दबावाखाली आली. त्याचा फायदा उठवत राफाएल क्रिव्हेलॅरो याच्या सुरेख पासवर रित्विकने 17व्या मिनिटाला जमशेदपूर एफसीचे खाते उघडले. तीन मिनिटांनी चेन्नईयिनला बरोबरीची संधी होती. मात्र, 20व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर त्यांना गोल करता आला नाही. अनिरुद्ध थापाने मारलेला चेंडू जय थॉमस याने व्यवस्थित क्लियर केला. त्यानंतर चेन्नईयिनने बरोबरीसाठी प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. मध्यंतराला काही मिनिटे शिल्लक असताना जमशेदपूरला आघाडी वाढवण्याची संधी होती. मात्र, इशान पंडित याने पेनल्टी बॉक्समध्ये मारलेला चेंडू जय थॉमसला गोलजाळ्यात ढकलता आला नाही.

उभय संघांची ही प्रत्येकी चौथी बरोबरी आहे. या बरोबरीनंतर चेन्नईयिन एफसीचे 12 सामन्यांतून 15 गुण झालेत. त्यात 4 विजय आणि 3 पराभवांचा समावेश आहे. जमशेदपूरचे 13 सामन्यांतून 6 गुण झालेत. त्यांना केवळ 1 विजय मिळवता आला असून 9 पराभव पाहावे लागलेत.

निकाल – जमशेदपूर एफसी-2(रित्विक दास 17 आणि 56व्या मिनिटाला) वि. चेन्नईयिन एफसी-2 (व्हिन्सी बॅरेटो 60व्या मिनिटाला, पीटर स्लिस्कोविक 68व्या मिमिटाला). प्रत्येकी एक गुण.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत सँडर गिले-जोरन व्लिगेन जोडीला विजेतेपद; भारताच्या जीवन नेदडूचेझियन-एन श्रीराम बालाजी यांना उपविजेतेपद
सूर्यकुमारने शतक झळकावलं, पण रोहितसारखी कामगिरी करण्यात पडला मागे; बातमी वाचाच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---