Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सूर्यकुमारने शतक झळकावलं, पण रोहितसारखी कामगिरी करण्यात पडला मागे; बातमी वाचाच

सूर्यकुमारने शतक झळकावलं, पण रोहितसारखी कामगिरी करण्यात पडला मागे; बातमी वाचाच

January 7, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Suryakumar-Yadav-And-Rohit-Sharma

Photo Courtesy: Twitter/ICC


जेव्हाही एखादा संघ चांगली कामगिरी करतो, मोठी धावसंख्या उभारतो, तेव्हा काही खेळाडूंचे त्यात अनन्यसाधारण योगदान असते. असेच योगदान सूर्यकुमार यादव याचेही भारतीय संघाच्या यशामध्ये आहे. भारतीय संघाने 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 200हून अधिक धावांचा डोंगर उभा केला होता. हा सामना भारताने तब्बल 91 धावांनी आपल्या खिशात घातला. तसेच, मालिका 2-1ने आपल्या खिशात घातली. या विजयात सूर्यकुमारचे मोलाचे योगदान राहिले. मात्र, त्याला रोहित शर्मा याच्या विक्रमाची बरोबरी करता आली नाही.

या सामन्यात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 229 धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाचा डाव 16.4 षटकात 137 धावांवर संपुष्टात आला. यामुळे भारताने मागील पराभवाचा हिशोब या सामन्यात चुकता करत 91 धावांनी विजय मिळवला. या विजयात भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाने जेव्हाही 200 किंवा त्याहून अधिक धावा केल्या, त्यामध्ये शतक साकारणाऱ्या खेळाडूंमध्ये सूर्यकुमारच्या नावाचा समावेश झाला. सूर्यकुमारने भारताची धावसंख्या 229 करताना शतक साजरे केले. त्याने 51 चेंडूत नाबाद 112 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 7 चौकार आणि 9 षटकारांचा पाऊस पाडला.

India set Sri Lanka a mammoth total in the third and final T20I!

Suryakumar Yadav’s inspired unbeaten 💯 helps leave the tourists needing 229 to win. #INDvSL | 📝Scorecard: https://t.co/v6DELbUa9F pic.twitter.com/ybWbpO7XLT

— ICC (@ICC) January 7, 2023

सूर्यकुमारपूर्वी या यादीत चार खेळाडूंचा समावेश आहे. त्यामध्ये विराट कोहली (Virat Kohli), केएल राहुल (KL Rahul), दीपक हुड्डा (Deepak Hooda) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या नावाचा समावेश आहे. यापैकी विराट, राहुल आणि हुड्डा यांनी टी20 मध्ये भारताच्या 200 हून अधिक धावांमध्ये प्रत्येकी एक शतक साकारले आहे. यांच्याव्यतिरिक्त रोहित शर्मा या यादीत अव्वलस्थानी आहे. त्याने सर्वाधिक 2 शतके साकारली आहे. (T20I Centuries where India scored 200 plus)

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 200 किंवा त्याहून अधिक धावा करताना शतक झळकावणारे फलंदाज
2 शतके- रोहित शर्मा
1 शतक- दीपक हुड्डा
1 शतक- केएल राहुल
1 शतक- विराट कोहली
1 शतक- सूर्यकुमार यादव*

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतासाठी सूर्यकुमारने केली बोहनी! झळकावलं 2023चं पहिलं शतक, मागील 15 वर्षांची यादी पाहाच
आता फक्त मोजत राहा! सूर्याच्या नावावर आणखी एक विक्रम; बनला चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज


Next Post
Tata open Maharashtra winners

टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत सँडर गिले-जोरन व्लिगेन जोडीला विजेतेपद; भारताच्या जीवन नेदडूचेझियन-एन श्रीराम बालाजी यांना उपविजेतेपद

File Photo

इंडियन सुपर लीग: चेन्नईयिनने जमशेदपूरला बरोबरीत रोखले

File Photo

ओडिशा एफसी पुन्हा विजयीपथावर, ईस्ट बंगाल एफसीवर 3-1 अशी मात

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143