भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसरा टी20 सामना शनिवारी (दि. 07 जानेवारी) राजकोट येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाचा जबरदस्त फलंदाज सूर्यकुमार यादव हा चांगलाच चमकला. सूर्यकुमारने 2022 वर्षाचा शेवट ज्या अंदाजात केला, त्याच अंदाजात त्याने 2023ची सुरुवात केली. सूर्यकुमारने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शानदार शतक झळकावले. विशेष म्हणजे, भारताकडून 2023ची सुरुवात शतकाने करण्याचा मान त्याने पटकावला. मात्र, मागील 15 वर्षांमध्ये भारताकडून नवीन वर्षाची सुरुवात शतकाने कोणत्या खेळाडूने केली, याची यादी पाहूयात.
भारतीय संघाकडून तिसऱ्या टी20 सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने अविस्मरणीय खेळी केली. त्याने या सामन्यात अवघ्या 45 चेंडूत शतक साजरे केले. तो या सामन्यात शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने यादरम्यान 51 चेंडूत 112 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 7 चौकार आणि 9 षटकारांची बरसात केली. भारतासाठी 2023मध्ये पहिले शतक ठोकण्याची कामगिरी सूर्यकुमारने करून दाखवली.
CENTURY for @surya_14kumar
A third T20I ???? in just 43 innings.
Take a bow, Surya!#INDvSL @mastercardindia pic.twitter.com/HZ95mxC3B4
— BCCI (@BCCI) January 7, 2023
परंतु मागील 15 वर्षात भारतीय संघासाठी नवीन वर्षाचे पहिले शतक कोणत्या खेळाडूने साकारले, याबद्दल जाणून घेऊया. 2010 बद्दल बोलायचं झालं, तर भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने त्यावेळी नवीन वर्षाचे पहिले शतक साजरे केले होते. त्याच्यानंतर 2011मध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने भारतासाठी पहिले शतक केले. पुढे 2012 ते 2014 या तिन्ही वर्षात विराट कोहली (Virat Kohli) याने भारतासाठी पहिले शतक केले होते.
यानंतर केएल राहुल (KL Rahul) याने 2015मध्ये नवीन वर्षात भारतासाठी पहिले शतक केले, 2016मध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) याने हा मान पटकावला. त्यानंतर 2017 आणि 2018मध्ये पुन्हा विराटने भारताकडून पहिले शतक केले. 2019मध्ये हा मान चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याच्याकडे गेला. त्यानंतर रोहितने 2020 आणि 2021 या दोनही वर्षात भारतासाठी पहिले शतक केले. 2022मध्ये हा मान रिषभ पंत (Rishabh Pant) याला मिळाला. यानंतर 2023चे भारतासाठी पहिले शतक सूर्यकुमारने झळकावले. (1st Century for India In Every year from 2010 see list)
मागील 15 वर्षात भारतासाठी पहिले शतक झळकावणारे खेळाडू
2010- एमएस धोनी
2011- सचिन तेंडुलकर
2012- विराट कोहली
2013- विराट कोहली
2014- विराट कोहली
2015- केएल राहुल
2016- रोहित शर्मा
2017- विराट कोहली
2018- विराट कोहली
2019- चेतेश्वर पुजारा
2020- रोहित शर्मा
2021- रोहित शर्मा
2022- रिषभ पंत
2023- सूर्यकुमार यादव*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता फक्त मोजत राहा! सूर्याच्या नावावर आणखी एक विक्रम; बनला चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
भारताचा ‘सूर्य’ नव्याने लिहितोय इतिहास! श्रीलंकन गोलंदाजांचा बाजार उठवत रचला मोठा विक्रम