---Advertisement---

पाच वर्षांपासून भारताकडून खेळला नाही अन् आता इंग्लंडमध्ये घालतोयं धुमाकूळ! एकट्यानेच घेतल्या 6 विकेट्स

On: शनिवार, ऑगस्ट 29, 2026 11:05 AM
---Advertisement---

मोठ्या कालावधीपासून भारतीय संघाबाहेर असलेल्या 27 वर्षीय गोलंदाजाने इंग्लंडमध्ये आपल्या जादुई फिरकीने लक्षवेधी कामगिरी केली आहे. काउंटी चॅम्पियनशीप डिव्हिजन वन 2026 मध्ये सरे संघाकडून खेळताना, राहुल चहरने एसेक्स संघाविरुद्ध पहिल्या डावात प्रभावी गोलंदाजी केली आणि एकट्यानेच 6 विकेट्स घेतल्या.

राहुलने आपल्या संघाचे सामन्यात आव्हान टिकवून ठेवण्यासाठी 22 षटकांत 4 निर्धाव षटके टाकली आणि 80 धावा देत 6 फलंदाजांना बाद केले.

या सामन्याच्या पहिल्या डावात राहुलच्या भेदक गोलंदाजीने एसेक्सच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकण्याची अधिक संधी मिळाली नाही. त्याने चार्ली एलिसन, मायकल पेपर, जमान अख्तर, सायमन हार्मर, जेमी पोर्टर आणि सॅम कूक यांना बाद केले.

प्रथम श्रेणीमध्ये आपल्या कारकीर्दीत पाच विकेट्स घेण्याची राहुलची ही नववी वेळ आहे. तसेच त्याची ही प्रथण श्रेणीतील दुसरी सर्वो्त्तम कामगिरी ठरली.

सामन्याची स्थिती पाहिली तर या सामन्यात एसेक्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. त्यांनी पहिल्या डावात 279 धावा केल्या आणि सरेचा पहिला डाव 183 धावसंख्येवर संपुष्टात आल्याने एसेक्सने 96 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असता सरेने दुसऱ्या डावात 51 धावसंख्येवर 4 विकेट्स गमावल्या आहेत.

राहुल भारतीय देशांतर्गत स्पर्धेत राजस्थानचे प्रतिनिधित्व करतो. या सामन्यात त्याचा राजस्थानचा संघसहकारी महिपाल लोमरोर यानेही गोलंदाजीत उपयुक्त योगदान दिले. त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरला (113 धावा) बाद केले. तसेच त्याने 13 षटके गोलंदाजी करताना 41 धावा देत एक विकेट घेतली.

राहुल चहर 2021 पासून भारतीय संघाबाहेर?
राहुलने 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 सामन्यामधून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. प्रोव्हिडन्स येथे खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात राहुलने तीन षटकांत 27 धावा देत एक विकेट घेतली होती.

आपल्या लहान आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत राहुलने सहा टी 20 सामने खेळताना 7 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने एक एकदिवसीय सामना खेळला आहे. कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या त्या सामन्यात त्याने 3 विकेट्स घेतल्या होत्या.

राहुल भारतासाठी शेवटचा 2021 मध्ये खेळला होता. आयसीसी टी 20 विश्वचषक 2021च्या त्या स्पर्धेत नामिबियाविरुद्ध खेळल्यानंतर त्याला पुन्हा भारतीय संघात संधी मिळाली नाही. (Rahul Chahar takes 6 Wickets in Essex vs Surrey County Championship Division One 2026)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---