बुद्धिबळ आणि भारत यांचे खास नाते आहे. क्रिकेटप्रमाणे जरी या खेळाला भारतात सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली नसली तर त्याचे भारतात अधिक महत्व आहे. या खेळाच्या विश्वस्तरावर अनेक स्पर्धा होत असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणावर भारताचे खेळाडू सहभागी होतात. बुद्धिबळ हे नाव घेताच विश्वनाथन आंनद याचे नाव डोक्यात येते. भारतात नुकतेच मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडली. त्या स्पर्धांचे नियोजन पाहून विदेशी अधिकारीही हवालदिल झाले आहेत.
भारतातील चेन्नईला ऑलिंपियाड स्पर्धेचे नियोजन करण्याची संधी मिळाली. मार्च महिन्यात मिळालेल्या या स्पर्धेचे यजमानपद रशियाला मिळाले होते, मात्र युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे त्यांच्याकडून यजमानपद काढण्यात आले. चार महिन्यात भारताने या स्पर्धेची अशी जय्यत तयारी केली की सर्व जण आश्चर्यचकित झाले. भारताने प्रथमच या स्पर्धेचे आयोजन केले होते. चार महिन्यांच्या आत भारताने बुद्धिबळाच्या या महत्वाच्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याने जगातील अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
तमिळनाडू सरकारने २०१३मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशीपचे आयोजन केले होते. मात्र यावेळेची स्थिती वेगळी होती. यावेळी १८६ देशांच्या १७३७ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी तमिळनाडू सरकारने १०० कोटी रुपये खर्च केले.
या स्पर्धेसाठी खेळाडूंच्या प्रवासाचीही विशेष तयारी करण्यात आली होती. खेळाडूंसाठी आणि विदेशी पाहुण्यांसाठी १२४ बस, १०० एसयूवी गाड्यांचे नियोजन केले गेले. चेन्नई विमानतळ ते महाबलिपुरम रस्ताचे रुदींकरण करण्यात आले. तर एक पूर्ण बाजू ऑलंपियाडसाठी आरक्षित केली होती.
या स्पर्धेच्या ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनी देखील भव्य आयोजन केले गेले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिनेते रजनीकांत उपस्थित होते. क्लोजिंग सेरेमनीसाठी फॉर पॉइंट्स ऑफ शेराटन या स्टेडियमला तोडून त्याला मोठे करण्यात आले. तसेच ओपनिंग सेरेमनीसाठी ३० हजारच्यावर लोक उपस्थित होते.
कोरोनामुळे विमानतळ, हॉटेल आणि ज्या ठिकाणी स्पर्धा होत्या तेथे कोरोना टेस्ट घेण्यात आल्या. त्यासाठी १००० डॉक्टरांनी रात्रंदिवस काम केले. तर सुरक्षेच्या बंदोबस्तासाठी ४००० पोलिसांचा ताफा ठेवण्यात आला. ड्रोण सुरक्षा करताना २८-२९ जुलै दरम्यान एकाही विमानाला शहरावरून उड्डाण करण्यास मनाई केली होती.
या स्पर्धेत भारताच्या महिला ए संघाने ऐतिहासिक कांस्य पदक पटकावले, तर पुरूष २ संघानेही कांस्य पदक जिंकले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Asia Cup 2022 | बुमराहच्या अनुपस्थितीत चमकदार कामगिरी करू शकतात भारताचे ‘हे’ तीन गोलंदाज
Asia Cup 2022: टीम इंडियामध्ये होणार मोठा बदल! ‘या’ खेळाडूची जागा धोक्यात
Asia Cup| ‘रोहित आणि टीम’ला द्यावी लागणार फिटनेस टेस्ट, ‘या’ दिवशी दुबईसाठी भरतील उड्डाण