भारतीय वेगवान गोलंदाज चेतन सकारियाने आयपीएल हंगामात चांगली कामगिरी केली होती. मागील वर्षी त्याला राजस्थान राॅयल्स संघाने १.२ कोटी रुपयांना खरेदी केले होते. मेगा लिलावापूर्वी त्याला संघात परत केले नव्हते. यावर्षी त्याला आयपीएल लिलावात दिल्ली कॅपिटल्स संघाने ४.२० कोटींना विकत घेतले आहे. त्याने लिलावात त्याची मूळ किंमत ५० लाख रुपये ठेवली होती. मागील हंगामात त्याने १४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याला आयपीएलच्या १५ व्या हंगामात एका दिग्गज खेळाडूची विकेट घ्यायची आहे.
श्रीलंका दौऱ्यावर त्याला भारतीय संघात (IND vs SL) पदार्पणाची संधी मिळाली होती. त्याला मागच्या लिलावापेक्षा तिप्पट जास्त किंमत मिळाली आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामात तो दिल्ली संघाकडून गोलंदाजी करताना दिसणार आहे. सर्व खेळाडूचे स्वप्न असते की, एका मोठ्या गोलंदाजाला बाद करावे. तसेच, चेतन सकारियाचे सुद्धा स्वप्न आहे की, त्याला भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची विकेट घ्यायची आहे.
चेतन एका मुलाखतीत म्हणाला, “एमएस धोनीची विकेट घेणे ही २०२१ मधील माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. माझे क्रिकेटमधील पदार्पण सुद्धा खास होते, परंतु धोनीची विकेट घेणे माझ्यासाठी खास होते. तो खेळाचा महानायक आहे आणि एका दिग्गज फलंदाजाला गोलंदाजी करणे आणि त्याला बाद करणे ही खूप मोठी भावना आहे.”
चेतन सकारियाला (Chetan Sakariya) विचारण्यात आले की, तुझे पुढचे लक्ष्य कोणते दोन खेळाडू आहेत. त्यावेळी त्याने सांगितले की, ‘त्याला एबी डिविलियर्सला बाद करायचे आहे, परंतु तो निवृत्त झाला आहे. तसेच, त्याला राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची विकेट घ्यायची आहे.’
“मी डिविलियर्सला नेट्ससोबतच सामन्यांमध्ये देखील गोलंदाजी केली. त्याला गोलंदाजी करणे हे खूप कठीण काम आहे. कारण, तो शेवटच्या षटकांमध्ये प्रत्येक प्रकारचा चेंडू खेळू शकतो. परंतु आता तो निवृत्त झाल्याने त्याला बाद करण्याची संधी मिळणार नाही. विराट हा एकमेव गोलंदाज आहे. मला ज्याला आयपीएल २०२२मध्ये बाद करण्याची इच्छा आहे,” असेही पुढे बोलताना तो म्हणाला.
सकारियाने आतापर्यंत १४ आयपीएल सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने ८.१९च्या इकॉनॉमी रेटने १४ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये सर्वाधिक हॅट्रिक घेणारे भारतीय गोलंदाज, एकाने तर तब्बल ३ वेळा केलाय पराक्रम
ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा! सेमीफायनलच्या तिकीटासह ‘या’ विक्रमावर कोरलं नाव