---Advertisement---

कपिल देव यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; माजी भारतीय क्रिकेटरने शेअर केला फोटो

On: रविवार, ऑक्टोबर 25, 2020 5:10 PM
---Advertisement---

माजी भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांचे जवळचे मित्र आणि माजी भारतीय क्रिकेटपटू चेतन शर्मा यांनी सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली आहे.

चेतन शर्मा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर कपिल देवचा डिस्चार्ज मिळतानाचा फोटो शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देत त्यांनी लिहिले आहे की, “डॉ. अतुल माथूर यांनी कपिल देवची एंजिओप्लास्टी केली होती. आता कपिलजी पूर्णपणे बरे झाले आहेत आणि त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.”

चेतन शर्मांनी दिले होते कपिल देवच्या आरोग्याचे अपडेट

भारताचे पहिले विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांना हृदविकाराचा झटका आल्यामुळे शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) त्यांना हॉस्पिटलमध्ये हालवण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर एंजिओप्लास्टी करण्यात आली होती. शनिवारी चेतन यांनी कपिल देवच्या तब्येतीचे अपडेट दिले होते. त्यावेळी पुढील २ दिवसात डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

“मी बरा होण्याच्या मार्गावर, चाहत्यांना धन्यवाद”, शस्त्रक्रियेनंतर कपिल देव यांचा संदेश

कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---