भारताचे पहिले विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांना हृदविकाराचा झटका आल्यामुळे शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर एंजिओप्लास्टी करण्यात आली. मात्र आता त्यांच्या तब्येतीत सुधार झाल्यामुळे येत्या २ दिवसात त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. आता त्यांचे मित्र आणि माजी क्रिकेटपटू चेतन शर्मांनी कपिल यांच्या तब्येतीचे अपडेट दिले आहेत.
चेतन शर्मांनी दिले अपडेट
चेतन यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर कपिल देव यांचा हॉस्पिटलमधला फोटो शेअर केला आहे. या फोटोत कपिल देव ऑपरेशननंतर बेडवर बसलेले दिसत आहेत आणि बाजूला त्यांची मुलगी अमायादेखील आहे. चेतन यांनी त्या फोटोला कॅप्शन देत लिहिले आहे की, “कपिल पाजी ऑपरेशननंतर ठीक आहेत. ते त्यांची मुगली अमायासोबत बसले आहेत.”
कपिल देव यांनीही दिली होती माहिती
त्यांच्यापूर्वी स्वत: कपिल देव यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या आरोग्याबाबत माहिती दिली होती. आपल्या अधिकृत ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये कपिल देव यांनी लिहिले की “तुम्हा सर्वांच्या प्रेमाबद्दल आणि चिंता व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. मी बरा होण्याच्या मार्गावर आहे. सर्वांना माझ्या शुभेच्छा.
कपिल देव यांची क्रिकेट कारकिर्द
कपिल देव यांनी भारताकडून १९७९ चे १९९४ पर्यंत १६ वर्षे क्रिकेट खेळले. यात त्यांनी अनेक अविश्वसनीय खेळी केल्या. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अष्टपैलू कामगिरी करताना वनडेमध्ये २२५ सामन्यात २५३ विकेट्स आणि ३७८३ धावा केल्या आहेत, तर कसोटीमध्ये १३१ सामन्यात ४३४ विकेट्स आणि ५२४८ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“मी बरा होण्याच्या मार्गावर, चाहत्यांना धन्यवाद”, शस्त्रक्रियेनंतर कपिल देव यांचा संदेश
कपिल देव यांना हृद्यविकाराचा झटका; सचिनसह ‘या’ क्रिकेटर्सनी केली प्रार्थना
भारताचे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात उपचार सुरु
ट्रेंडिंग लेख-
चेन्नईचे तारणहार बनण्यास तयार आहेत ४ युवा प्रतिभावान खेळाडू ; मुंबईविरुद्ध मिळणार संधी?
‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’
“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला






