---Advertisement---

BREAKING: टीम इंडियाला मिळाली नवी निवडसमिती! अध्यक्ष म्हणून चेतन शर्मांचीच फेरनिवड; चार नवे सदस्य सामील

On: शनिवार, जानेवारी 7, 2023 5:15 PM
Chetan Sharma
---Advertisement---

मागील जवळपास दीड महिन्यांपासून भारतीय क्रिकेट पुरुष क्रिकेट संघाच्या नव्या निवड समितीची सर्वांना प्रतीक्षा होती. मागील निवड समितीच्या बरखास्तीनंतर निवड समितीत कोण बसणार याविषयी उत्सुकता ताणली गेलेली. शनिवारी (7 जानेवारी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नवीन निवडसमिती जाहीर केली. विशेष म्हणजे मागील बरखास्त केलेल्या निवड समितीचे अध्यक्ष असलेले चेतन शर्मा (Chetan Sharma) हेच नव्या निवड समितीचेही अध्यक्ष असणार आहेत. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

टी20 विश्वचषकातील पराभवानंतर सर्वात प्रथम निवड समितीला बरखास्त करण्यात आले. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील या निवड समितीत हरविंदर सिंग, सुनील जोशी व देबशीष मोहंती यांचा समावेश होता. यानंतर बीसीसीआयने तातडीने नव्या निवड समितीसाठी अर्ज मागवले होते. जवळपास 50 दिवस लांबलेल्या प्रक्रियेनंतर नव्या निवड समितीची घोषणा केली.

चेतन शर्मा हेच पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळताना दिसतील. ते उत्तर विभागाचे प्रतिनिधी असतील. सदस्य म्हणून पश्चिम विभागाचे सलील अंकोला, पूर्व विभागाचे शिवसुंदर दास, मध्य विभागाचे सुब्रतो बॅनर्जी व दक्षिण विभागाचे श्रीधरन शरथ हे प्रतिनिधी असतील. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपासून ते त्यांची जबाबदारी स्वीकारतील.

सुलक्षणा नाईक, अशोक मल्होत्रा ​​आणि जतिन परांजपे यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने (CAC) नव्या निवड समितीच्या सदस्यांची निवड केली. बीसीसी निवडसमितीच्या पाच जागांसाठी मागवलेल्या जाहिरातीला तब्बल 600 माजी खेळाडूंनी प्रतिसाद दिला होता. त्यातून 11 नावे अंतिम मुलाखतीसाठी निवडली गेलेली.

(Chetan Sharma to continue as chairman of BCCI senior men’s selection committee; board announces five-member panel)

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हा तर गोलंदाजांचा अपमान’, रन-आऊट प्रकरणात अश्विनने घेतली ऍडम झम्पाची बाजू, डेविस हसीला सुनावले
श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकारा फिट, पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये केले गेले यशस्वी उपचार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---