भारतीय क्रिकेट संघाचा आशिया चषक 2022 मधील प्रवास जवळपास संपुष्टात आला आहे. साखळी फेरीतील धडाकेबाज प्रदर्शनानंतर भारतीय संघाने सुपर-4 फेरीतील त्यांचे पहिले दोन्हीही सामने गमावले आहेत. पाकिस्तानविरुद्ध 5 गड्यांनी पराभूत झाल्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या करा अथवा मरा सामन्यातही भारताच्या हाती निराशाच आली. त्यांनी 6 विकेट्सने हा सामना गमावला. रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव वगळता इतर फलंदाजांनी घोर निराशा केल्याने हा पराभव झाल्याचे अनेकांनी म्हटले आहे. त्याचवेळी भारतीय कसोटी संघाचा प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा याने भारतीय संघाच्या फलंदाजांविषयी एक महत्त्वाचे वक्तव्य केले.
एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना पुजारा याने भारतीय फलंदाजांच्या कमजोरीविषयी आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला,
“मला वाटते भारतीय संघाची समस्या 6 ते 15 षटकातील आहे. ज्या कालावधीत धावा जमवणे आणि गडी हातात राखणे गरजेचे असते त्याचवेळी आपण सातत्याने बळी गमावतोय. याचाच परिणाम म्हणून अखेरच्या षटकांमध्ये आपल्याकडे धावा करण्यासाठी फलंदाज उरत नाहीत. भारताला या कमजोरीवर तोडगा काढावा लागेल.”
पुजारा नुकताच इंग्लंडमध्ये काउंटी व वनडे स्पर्धा खेळून आहे. यादरम्यान त्याने शानदार फॉर्म दाखवा स्पर्धेत दुसऱ्या सर्वाधिक धावा काढल्या यात चार शतकांचा समावेश होता.
दरम्यान या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 173 धावा फलकावर लावल्या. भारताकडून कर्णधार रोहितने एकाकी झुंज दिली. 41 चेंडू खेळताना त्याने 72 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 4 षटकार आणि 5 चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त सूर्यकुमार यादव 34 धावा करू शकला. प्रत्युत्तरात सलामीवीर पथुम निसांका (52 धावा) आणि कुसल मेंडिस (57 धावा) यांच्या खेळींच्या जोरावर श्रीलंकेने 1 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. या विजयासह श्रीलंकेने अंतिम सामन्यातील त्यांची जागा निश्चित केली आहे. पाकिस्तान अफगाणिस्तान विरुद्धचा सामना जिंकून दुसरी जागा आपल्या नावे करण्याचा प्रयत्न करेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दीपक हुड्डाकडून गोलंदाजी का करून घेतली नाही?, कर्णधार रोहितने सांगितले कारण
भारतातील ‘या’ मैदानातील स्टँडला दिले भज्जी अन् युवीचं नाव! वाचा सविस्तर
नजरों से नजर मिली.. पंत नव्हे ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरसोबत उर्वशीचा भिडलाय टाका? तुम्हीही पाहा