इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत आपल्या जबरदस्त फलंदाजीने संघाचे सामन्यात पुनरागमन करवणारे रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा जखमी झाले आहेत. दोघांच्या दुखापतीमुळे भारतीय संघाचा ताण वाढला आहे. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा हे दोघे ओव्हल कसोटीच्या चौथ्या दिवशी फलंदाजी करतेवेळी जखमी झाले होते. त्यामुळे चौथ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजीवेळी त्यांना क्षेत्ररक्षणही करता आले नाही.
भारताच्या दुसऱ्या डावात रोहितने १२७ धावा आणि पुजाराने ६१ धावा केल्या. पण त्यापुढील इंग्लंडच्या डावात दोन्ही फलंदाज क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरलेच नाहीत. यामुळे कर्णधार विराट कोहली आणि संघ आता मालिकेच्या ५ व्या आणि शेवटच्या सामन्याबद्दल चिंतेत आहे.
यातच फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी दोघांच्या तब्येतीबाबत मोठे विधान केले आहे. फलंदाजी प्रशिक्षकांनी जे सांगितले ते खरोखरच तणाव वाढवणारे आहे.
‘रोहित आणि पुजाराच्या दुखापतीचे स्कॅन करण्यात आले आहे. प्रत्येकजण त्यांच्या अहवालाची वाट पाहत आहे, जो ६ सप्टेंबरला येण्याची शक्यता आहे. रोहित गुडघ्याच्या दुखापतीशी झुंज देत आहे आणि पुजारा घोट्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे,’ असे त्यांनी सांगितले आहे. भारताच्या दुसऱ्या डावात दोघांमध्ये १५३ धावांची भागीदारी झाली. या दरम्यान, धावा घेताना पुजाराच्या घोट्याला मुरड आली आणि त्याच्या डावादरम्यान त्याला पट्टी बांधून खेळावे लागले.
तत्पूर्वी, भारताने दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी केली आहे. सलामीवीर रोहित शर्माने जबरदस्त १२७ धावांची खेळी केली. केएल राहुलने ४६ धावा करून त्यास चांगली साथ दिली. पुजाराने संयमी अर्धशतक करत ६१ धावा केल्या. कर्णधार विराटने ४४ धावा केल्या. रवींद्र जडेजाने १७ धावा केल्या तर अजिंक्य पुन्हा निराशा करत भोपळाही न फोडता तंबूत परतला. रिषभ पंत (५०) आणि शार्दूल ठाकूर (६०) यांनी दमदार अर्धशतक करत आघाडी ३०० पार नेली. बुमराह (२४) आणि उमेश यादवने (२५) फटकेबाजी करत झटपट धावा केल्या. भारतीय संघाने इंग्लंडसमोर ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने बिनबाद ७७ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
आधी शार्दुल मग रिषभ, मांजरेकरांचे कौतुकास्पद बोल अन् लयीतील फलंदाज तंबूत; झाले ट्रोल
ओव्हलवरील दे दणादण प्रदर्शनाने शार्दुल बनला भारताचा नवा नायक, पण ‘या’ खेळाडूंची जागा धोक्यात
ओव्हल कसोटी जिंकण्यासाठी इंग्लंडला चमत्काराची गरज! भारताविरुद्धची ‘ही’ आकडेवारी देते ग्वाही