दुलीप ट्रॉफी 2023चा अंतिम सामना वेस्ट झोन विरुद्ध साऊथ झोन असा झाला. या रंगतदार सामन्यात रविवारी (16 जुलै) म्हणजेच शेवटच्या दिवसी साऊथ झोनने विजय मिळवला. सूर्यकुमार यादव आणि चेतेश्वर पुजारा हे दिग्गज फलंदाज दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सपशेल अपयशी ठरले. परिणामी वेस्ट झोन संघाला या सामन्यात 75 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
वेस्ट झोन संघाकडून या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा भिंत अशी ओळख असणाऱ्या चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि मागच्या काही वर्षात टी-20 क्रिकेटमधील सरधोपट खेळीमुळे प्रसिद्ध असलेला सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे दोन दिग्गज खेळ होते. या दोघांकडूनही चाहते आणि संघाला खूप अपेक्षा होत्या. मात्र दोघांनीही सर्व अपेक्षांवर पाणी फेरल्याचे पाहायला मिळाले. चेतेश्वर पुजाराने साऊथ झोनविरुद्धच्या या सामन्यात 9 आणि 15 धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने 8 आणि 4 झावांवर विकेट्स गमावल्या. पुजारा आणि सूर्यकुमार संघासाठी मदळ्या फळीत खेळत असल्यामुळे आणि स्वस्तात बाद झाल्यामुळे वेस्ट झोनच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले. सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये वेस्ट झोन साऊथ झोनपेक्षा पिछाडीवर राहिला.
एकंदरीत विचार केला, तर नाणेफेक वेस्ट झोनने जिंकली आणि साऊथ झोनला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले गेले. पहिल्या डावात साऊथ झोनने213, तर वेस्ट झोनने 146 धावा केल्या. पहिल्य धावात मिळालेली आघाडी साऊथ झोनने दुसऱ्या डावात अधिकच मोठी केली. दुसऱ्या डावात साऊथ झोन संघ 230 धावांवर सर्वबाद झाला आणि वेस्ट झोनपुढे 298 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात वेस्ट झोन संघ शेवटच्या डावात 222 धावांवर गुंडाळला गेला आणि सामना साऊथ झोनने जिंकला. शेवटच्या डावात सलामीवीर प्रयांक पांचाल आणि सरफराज खान यांनी अनुक्रमे 95 आणि 48 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. पण वेस्ट झोनला विजय मात्र मिळवून देऊ शकले नाहीत. (Cheteshwar Pujara and Suryakumar Yadav failed in the Duleep Trophy 2023 final)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING । साऊथ झोनचा कॅप्टन हनुमा विहारीने उंचावली 2023 दुलीप ट्रॉफी! कवेरप्पा ठरला सामनावीर
IPL Auctionमध्ये खरेदी न केल्याने RCBवर संतापलेला चहल, बोलणंही केलं होतं बंद; स्वत:च केला खुलासा