भारतीय कसोटी क्रिकेट संघाची नवी भिंत म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा 9 महिन्यांनंतर पुन्हा मैदानात उतरणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजीचा एक मजबूत दुवा मानला जाणारा चेतेश्वर पुजारा फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामना खेळताना शेवटचा दिसला होता, त्यानंतर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे त्याला मैदानात परत जाण्याची संधी मिळू शकली नाही. आता तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध 17 डिसेंबरपासून सुरू होणार्या कसोटी मालिकेत भारतीय संघासाठी पुन्हा फलंदाजी करताना दिसणार आहे.
या मालिकेदरम्यान पुजाराला मोठा विक्रम करण्याची संधी आहे. त्याला कसोटी क्रिकेटमध्ये 6000 धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवण्याती संधी आहे. आतापर्यंतच्या कारकीर्दीत पुजाराने 77 कसोटी सामन्यांमध्ये 48.60 च्या सरासरीने 5840 धावा केल्या आहेत आणि 6000 धावा करण्यासाठी त्याला केवळ 160 धावांची गरज आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत चेतेश्वर पुजाराने 160 धावा केल्या तर 6000 धावांचा टप्पा गाठणारा तो 11 वा भारतीय खेळाडू ठरणार आहे
याआधी भारतीय क्रिकेट संघासाठी 6000 कसोटी धावा करणारे फलंदाज –
सचिन तेंडुलकर 15921 धावा
राहुल द्रविड 13265 धावा
सुनील गावस्कर 10122 धावा
व्हीव्हीएस लक्ष्मण 8781 धावा
वीरेंद्र सेहवाग 8503 धावा
विराट कोहली 7240 धावा
सौरव गांगुली 7212 धावा
दिलीप वेंगसरकर 6868 धावा
मोहम्मद अझरुद्दीन -6215 धावा
गुंडप्पा विश्वनाथ – 6080 धावा
9 महिन्यांनी पुजाराचे मैदानावर पुनरागमन
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळण्यासाठी दाखल झालेल्या भारतीय संघातील बहुतेक खेळाडू आयपीएलचा भाग होते. पण कोणत्याही संघाशी संबंधित नसल्यामुळे पुजारा आयपीएलमध्येही खेळलेला नाही. अशा परिस्थितीत पुजाराला मैदानापासून दूर राहिल्याने सुमारे 9 महिन्यांनंतर मैदानात परत येणे कठीण होईल.
ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅकग्राला असा विश्वास आहे की याचा फायदा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना होईल, त्यांच्यासमोर पुजारा या मालिकेत संघर्ष करताना दिसेल.
जेव्हा भारतीय संघाने 2018-2019 मध्ये ऑस्ट्रेलिया दौरा केला होता तेव्हा पुजाराने 4 कसोटी सामन्यात 3 शतके आणि एका अर्धशतकाच्या मदतीने 521 धावा केल्या होत्या. त्याच्या शानदार फलंदाजीमुळे भारताला मालिका 2-1 ने जिंकता आली.
पुजाराला यावर्षी केवळ स्वत: ला सिद्ध करण्याची गरज नाही तर कर्णधार विराट कोहली पहिल्या सामन्यानंतर भारतात परतल्या नंतरही संघाची फलंदाजी मजबूत करण्याची जबाबदारीही त्याच्या खांद्यावर असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माला मिळायला हवे कसोटी कर्णधारपद, माजी दिग्गजाचे मोठे भाष्य
आनंदाची बातमी! राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचा समावेश, ‘हे’ संघ खेळणार स्पर्धा
ट्रेंडिंग लेख –
…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात
हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश
पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी