भारतीय संघ 2020-21 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यातील वनडे सामन्यांच्या मालिकेला 27 नोव्हेंबर पासून सुरुवात होईल. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या दौऱ्यावर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिलाच सामना खेळून भारतात परतणार आहे. त्याने पालकत्व रजा घेतली आहे. मात्र, त्याच्या अनुपस्थितीतही भारताच्या एका फलंदाजाची विकेट खूप महत्वाची आहे, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला आहे
हेझलवूडला विचारण्यात आले की पुजारा आणि अजिंक्य रहाणे या फलंदाजांविरुद्ध काय रणनीती असेल, विशेषत: पुजाराविरुद्ध, जो अधिक काळ खेळपट्टीवर टिकून खेळतो आणि गोलंदाजांना दमवून सोडतो.
याचे उत्तर देताना हेजलवुड म्हणाला की, “होय बरोबर आहे. मागच्या वेळी जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियात आला, तेव्हा पुजाराने उत्कृष्ट कामगिरी केली होती. तो अचूकतेने फटके खेळणारा फलंदाज आहे. तो आधी गोलंदाजांना दमवतो आणि त्यानंतर मधल्या षटकांत वेगवान धावा करतो. पुजाराची विकेट मूल्यवान आहे आणि यावेळी या आव्हानासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत.”
ऍडिलेड येथे 17 डिसेंबरला चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाहिल्या सामन्याला सुरुवात होईल. हा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. भारतीय संघ परदेशात प्रथमच दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाकडे दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याचा अधिक अनुभव आहे. अशा परिस्थितीत पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला विजय मिळाला, तर ही बाब भारतीय संघाची चिंता वाढवू शकते.
पुढे बोलताना हेझलवुड म्हणाला की, “पाच-सहा वर्षांत आम्ही सर्वाधिक दिवस-रात्र कसोटी सामने खेळलो आहे. आमच्या संघातील वेगवान गोलंदाजांना गुलाबी चेंडूने गोलंदाजी करण्याचा चांगला अनुभव आहे. नवीन चेंडूने कशी गोलंदाजी करायची आणि गोष्टी कशा हाताळायच्या हे आम्हाला ठाऊक आहे. आम्ही या अनुभवाचा फायदा घेऊन मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवू इच्छितो.”
भारतीय संघाने 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलिया दौर्यावर प्रथमच कसोटी मालिका जिंकली होती. पुजाराने या मालिकेत चार कसोटी सामन्यांमध्ये 74..42 च्या सरासरीने 521 धावा केल्या होत्या ज्यामध्ये त्याने तीन शतके ठोकली होती. चौथ्या कसोटी सामन्यात त्याने नाबाद 193 धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माला मिळायला हवे कसोटी कर्णधारपद, माजी दिग्गजाचे मोठे भाष्य
आनंदाची बातमी! राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचा समावेश, ‘हे’ संघ खेळणार स्पर्धा
ट्रेंडिंग लेख –
…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात
हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश
पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी