नवी दिल्ली | इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनने शानदार गोलंदाजी केली. त्याने या स्पर्धेत आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले. मात्र असे असूनही ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली नाही. याबाबत भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्याला विश्वास आहे की अश्विन टी20 सामन्यासाठी प्रभावी ठरू शकतो.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि टी20 सामन्यात आर अश्विनला संघात दिले नाही स्थान
आर अश्विनने आयपीएलमध्ये पॉवरप्लेमध्ये चांगली गोलंदाजी केली.त्याने आरसीबीचा कर्णधार विराट कोहली, ख्रिस गेल, निकोलस पूरण यासारख्या चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजांना बाद केले. तथापि, इतकी नेत्रदीपक कामगिरी करूनही अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेत स्थान देण्यात आले नाही. अश्विन गेल्या अनेक महिन्यांपासून भारताकडून मर्यादीत षटकांचे सामने खेळलेला नाही.
अश्विन भारतीय टी20 संघासाठी प्रभावी ठरेल – मोहम्मद कैफ
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सचा सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफ याचा असा विश्वास आहे की अश्विन हा भारतीय टी20 संघाचा एक भाग असावा, तो संघासाठी खूप उपयुक्त ठरू शकेल.
मोहम्मद कैफ याने बुधवारी (18 नोव्हेंबर) आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट केले ज्यामध्ये लिहिले की, “आयपीएलच्या 13 व्या हंगामात अश्विनने विराट, रोहित, पोलार्ड, गेल, वॉर्नर, क्विंटन डी कॉक, बटलर, स्मिथ, देवदत्त पडिक्कल आणि निकोलस पूरन यांना बाद केले आहे. हे पुन्हा काळजीपूर्वक वाचा. ही अश्विनने आयपीएलदरम्यान विशेषत: पॉवरप्लेदरम्यान घेतलेल्या बळींची यादी ही आहे. मला वाटते अश्विन अजूनही भारतीय टी20 संघासाठी प्रभावी ठरू शकेल.”
Virat, Rohit, Pollard, Gayle, Warner, QDK, Karun, Buttler, Smith, Paddikal, Pooran. Read and re-read @ashwinravi99’s list of big scalps from IPL 13, mostly in power plays. Feel Ash can still be a valuable asset for India in T20Is.
— Mohammad Kaif (@MohammadKaif) November 18, 2020
आर अश्विनला कसोटी संघात मिळाले स्थान
आर अश्विन ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यात तो 2017 मध्ये भारतीय संघाचा भाग होता, तेव्हापासून त्याला केवळ भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले आहे.
कसोटी सामन्यांची करत आहे तयारी
आर अश्विन सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहे. सोमवारी सराव सत्रात अश्विन केएल राहुल विरुद्ध गोलंदाजी करत होता. या दरम्यान तो टेनिस रॅकेटचा वापर करत होता आणि राहुलने त्याच्या गोलंदाजीवर पूल शॉट्स खेळण्याचा सराव केला.
आर अश्विनची आयपीएलमधील कामगिरी
आर अश्विनने आयपीएल 2020मधील 15 सामन्यात 7.66 च्या इकॉनॉमी रेटने 13 बळी घेतले आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीनही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांची होईल मालिका
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 वनडे सामने, 3 टी20 सामने आणि 4 कसोटी सामने खेळले जातील. या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 27 नोव्हेंबरपासून सिडनी येथे होणार्या वनडे सामन्याने होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना ऍडिलेड येथे होणार नाही? जोश हेझलवूडने दिली माहिती
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानावर एकत्र खेळू शकत नाही बुमराह आणि शमी; जाणून घ्या कारण
“मी ८० वर्षाचा म्हातारा….”, लँगर यांच्या पत्राला ब्रॅडमन यांनी दिले होते मजेशीर उत्तर
ट्रेंडिंग लेख –
…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात
हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश
पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी






