टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा यानं कारकिर्दीतील 65वं प्रथम श्रेणी शतक झळकावलं आहे. त्यानं लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर ही कामगिरी केली. सध्या पुजारा इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन टू 2024 मध्ये खेळत आहे. तो गेल्या काही काळापासून भारतीय क्रिकेट संघाच्या बाहेर आहे. त्यामुळे संघात कमबॅक करण्यासाठी तो काउंटी क्रिकेटमध्ये घाम गाळतोय.
चेतेश्वर पुजारा सध्या काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन 2 मध्ये ‘ससेक्स’कडून खेळत आहे. या स्पर्धेत ‘मिडलसेक्स’विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात पुजारानं शतक झळकावलं, जे त्याचं 65वं प्रथम श्रेणी शतक होतं. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्यानं आपलं शतक पूर्ण केलं. पुजारानं चौकाराच्या मदतीनं शतक झळकावलं.
Cheteshwar Pujara has a century at Lord’s.
A typically patient innings from the Sussex International, reaching his century in 256 balls. pic.twitter.com/Y16Id4w3MC
— Vitality County Championship (@CountyChamp) May 25, 2024
चेतेश्वर पुजारा टीम इंडियासाठी फक्त कसोटी क्रिकेट खेळतो. मात्र गेल्या काही काळापासून तो भारताच्या कसोटी संघात देखील स्थान मिळवू शकलेला नाही. पुजारानं भारतासाठी शेवटचा कसोटी सामना 7 जून 2023 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता, जो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होता. त्यानंतर 36 वर्षीय पुजाराला टीम इंडियात स्थान मिळू शकलेलं नाही. यानंतर पुजारानं रणजी ट्रॉफीमध्ये खेळायला सुरुवात केली, मात्र तरीही टीम इंडियाचे दरवाजे त्याच्यासाठी पुन्हा उघडले गेले नाहीत.
चेतेश्वर पुजारानं ऑक्टोबर 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरूमध्ये खेळला. पुज्जीनं आतापर्यंत 103 कसोटी आणि 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या 176 डावांत फलंदाजी करताना त्यानं 43.61 च्या सरासरीनं 7195 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्यानं 19 शतकं आणि 35 अर्धशतकं झळकावली. नाबाद 206 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. चेतेश्वर पुजारानं कसोटीत 863 चौकार आणि 16 षटकार मारले आहेत. याशिवाय त्यानं 5 एकदिवसीय डावात 51 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाची घोषणा, मोहम्मद अमीरचं पुनरागमन