---Advertisement---

चेतेश्वर पुजाराच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला १० वर्षे पूर्ण, चाहत्यांचे मानले ‘असे’ आभार

On: शुक्रवार, ऑक्टोबर 9, 2020 10:45 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला आज (९ ऑक्टोबर) १० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. प्रत्युत्तरात पुजाराने चाहत्यांचे अभिवादन केले आहे.

पुजाराने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर लिहिले की, “मला खूप आनंद होत आहे की, मी भारतीय संघाकडून क्रिकेट खेळताना १० वर्षे पूर्ण केली आहेत. राजकोटपासून सुरुवात करण्यापासून ते माझ्या आई-वडिलांसमोर खेळता-खेळता आज मी इथपर्यंत आलो आहे. या सगळ्याची मला कल्पनादेखील केली नव्हती. या १० वर्षांत मला पाठिंबा देण्यासाठी तुमचा धन्यवाद चाहत्यांनो. तसेच मी भविष्यातही अशाप्रकारे चांगले प्रदर्शन करत राहील.”

“हा दिवस मला अजून एका गोष्टीसाठी स्मरणात राहील, कारण योगायोगाने आजच्या दिवशीच माझ्या पत्नीचा जन्म झाला होता. त्यामुळे मी हा दिवस कधीच नाही विसरु शकत,” असेही पुढे बोलताना पुजारा म्हणाला.

 

९ ऑक्टोबर २०१० रोजी बेंगलोर येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी पदार्पणाच्या सामन्यातच त्याने ७२ धावांची खेळी केली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत पुजाराने भारताकडून ७७ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४८.६६च्या सरासरीने ५८४० धावा केल्या आहेत. तर वनडेत ५ सामन्यात ५१ धावांची कामगिरी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शेन वॉर्नने त्याला म्हटले होते भारताचा मोठा स्टार; पण ‘तो’ अचानकच झाला आयपीएलमधून गायब आणि आता…

लज्जास्पद! कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतर धोनीच्या ५ वर्षांच्या मुलीला बलात्काराची धमकी

अविश्वसनीय! थेट गोलंदाजानेच १०० मीटरपर्यंत धाव घेत पकडला झेल, व्हिडिओ होतोय व्हायरल

ट्रेंडिंग लेख-

हैदराबादने एकहाती जिंकला सामना; जाणून घ्या पंजाबच्या पराभवाची ५ कारणे

किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला

IPL 2020: राजस्थान विरुद्ध दिल्ली सामन्यात स्मिथ, अय्यरसह ‘हे’ ५ खेळाडू करु शकतात खास विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---