जुलै महिन्यात होत असलेल्या भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वनडे व कसोटी संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली. कसोटी संघात या दौऱ्यासाठी अनेक बदल केल्याचे दिसून येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय कसोटी संघाचा प्रमुख फलंदाज असलेला चेतेश्वर पुजारा या संघात दिसून येत नाही. त्याला विश्रांती दिली की, आता त्याची संघातून हकालपट्टी करत युवा खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
या दौऱ्यावर भारतीय संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. त्यासाठी रोहित शर्मा हाच कर्णधार असेल. तर, उपकर्णधार म्हणून पुनरागमन केलेल्या अजिंक्य रहाणे याची वर्णी लागली आहे. तसेच अनुभवी विराट कोहली हा देखील संघातील आपली जागा वाचवण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे चेतेश्वर पुजारा याला संघातून बाहेर केल्याचेच स्पष्टपणे दिसून येते. पुजाराची कामगिरी मागील काही काळापासून भारतीय संघासाठी हवी तशी होत नव्हती. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील तो पूर्णतः अपयशी ठरला होता. त्यामुळे लवकरच त्याला भारतीय संघातून बाहेर केले जाऊ शकते अशी चर्चा सुरू झालेली. या दौऱ्यासाठी त्याची निवड न करून निवडसमिती व बीसीसीआयने यावर शिक्कामोर्तब केल्याचे दिसून येते.
पुजारा याला संघातून बाहेर केल्यानंतर आता या संघात युवा यशस्वी जयस्वाल व ऋतुराज गायकवाड यांची वर्णी लागली आहे. मागील हंगामात या दोघांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये तसेच त्यानंतर झालेल्या आयपीएलमध्ये खोऱ्याने धावा काढलेल्या. त्यामुळे भविष्याचा विचार करता भारतीय संघात तिसऱ्या क्रमांकावर या दोघांपैकी एक जण कायमस्वरूपी दिसू शकतो. यशस्वी नुकत्याच झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या स्टॅन्ड बायमध्ये होता.
(Cheteshwar Pujara Dropped From Test Team For West Indies Tour Ruturaj And Jaiswal In Sqaud)
महत्वाच्या बातम्या –
6, 6, 6, 6, 6 । इंग्लिश फलंदाजाची वादळी खेळी, आरसीबी कॅम्पमध्ये आनंदाची लाट
फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजावर आयसीसीकडून बंदी, वाचा वर्ल्ड कप क्वॉलिफायर सामन्यात काय घडलं