सिडनी। आजपासून(3 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाला योग्य ठरवताना भारताकडून मयंक अगरवाल आणि चेतेश्वर पुजाराने अर्धशतके केली आहेत. याबरोबरच चेतेश्वर पुजाराने एक खास विक्रमही केला आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या मालिकेत 1000 चेंडूचा सामना केला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियन भूमीत एका कसोटी सामन्यात 1000 किंवा त्यापेक्षा अधिक चेंडूचा सामना करणारा पुजारा केवळ पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे.याआधी असा विक्रम विजय हजारे, सुनील गावसकर, राहुल द्रविड, विराट कोहली यांनी केला आहे.
तसेच पुजाराने एका कसोटी सामन्यात 1000 किंवा त्यापेक्षा अधिक चेंडूचा सामना करण्याची ही दुसरीच वेळ आहे. याआधी त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच मायदेशात फेब्रुवारी-मार्च 2017 मध्ये पार पडलेल्या कसोटी मालिकेत 4 कसोटी सामन्यात 1049 चेंडूंचा सामना केला होता.
ऑस्ट्रेलियन भूमीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध एका कसोटी सामन्यात सर्वाधिक चेंडूचा सामना करणारे फलंदाज –
1203 चेंडू – राहुल द्रविड (2003-04)
1192 चेंडू – विजय हजारे (1947-48)
1093 चेंडू – विराट कोहली (2014-15)
1045 चेंडू* – चेतेश्वर पुजारा (2018-19)
1032 चेंडू – सुनील गावसकर (1977-78)
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट कोहली एक्सप्रेस सुसाट, सचिन, लाराचे विक्रम मोडीत
–एका तासांत केएल राहुलबद्दल झाले तब्बल ५१३४ ट्विट, भारतात पहिल्या नंबरवर ट्रेंडिंग
–क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकरांबद्दल या ५ गोष्टी माहित आहेत का?