भारतीय संघाची दुसरी ‘द वॉल’ समजल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजारा याने बांगलादेश विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक मोठी कामगिरी केली. त्याने क्रिकेटमधील सर्वात मोठ्या प्रकारात 7000 धावांचा आकडा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा पुजारा भारताचा 8वा तर जगातील 55वा खेळाडू बनला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पुजाराने सर डॉन ब्रॅडमन यांना मागे पाडले. ब्रॅडमन यांनी 52 कसोटी सामन्यात 99.94च्या अविश्वसणाय सरासरीने 6996 धावा केल्या.
भारताचा चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आपला 98वा कसोटी सामना बांगलादेश विरुद्ध खेळत आहे, त्याने 44.48च्या सरासरीने 7000 धावांचा टप्पा गाठला आहे. यात त्याने 19 शतके तर 34 अर्धशतके झळकावली आहेत. भारतासाठी सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकर याने केल्या आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 15921 धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर भारताचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) हे आहेत. त्यांनी कसोटीमध्ये 13265 धावा केल्या आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) हे आहेत. त्यांनी कसोटी क्रिेकेटमध्ये 10122 धावा केल्या आहेत. त्यांच्यानंतर या यादीत व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) याचा क्रमांक लागतो, ज्यांने कसोटीमध्ये 8781 धावा केल्या आहेत. वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) या यादीत पाचव्या क्रमांकावार आहे. त्याने आपल्या कसोटी कारकीर्दीत 8503 धावा केल्या आहेत. त्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) याचा क्रमांक लागतो, त्याने 8094 धावा केल्या आहेत. माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) 7212 धावा करत या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. या यादीत विराट कोहली एकुलता एक खेळाडू आहे, जो अजूनही क्रिकेट खेळत आहे, बाकी सर्व खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे.
भारत आणि बागंलादेश या संघात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 227 धावांवर सर्वबाद झाला. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघ आपल्या पहिल्या डावात 4 बाद 217 या धावसंख्येवर खेळत आहे. भारतासाठी रिषभ पंत (Rishabh Pant) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) अजूनही खेळपट्टीवर आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: रिषभ पंतने रनआऊट होण्यापासून वाचवले, तरी विराट भडकला; रिऍक्शन व्हायरल
‘तू काय आता बीसीसीआयचा अध्यक्ष नाही तर…’ लाईव्ह टीव्हीवर गांगुलीला हे काय बोलून गेले गावसकर