Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

VIDEO: रिषभ पंतने रनआऊट होण्यापासून वाचवले, तरी विराट भडकला; रिऍक्शन व्हायरल

VIDEO: रिषभ पंतने रनआऊट होण्यापासून वाचवले, तरी विराट भडकला; रिऍक्शन व्हायरल

December 23, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Virat Kohli Reaction

Photo Courtesy: Twitter


बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यजमानांनी उत्तम प्रदर्शन केले. पहिल्या सत्रातच भारताच्या एका पाठोपाठ विकेट्स पडत गेल्या. जेवणाच्या ब्रेकपर्यंत भारताने कर्णधार केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा यांच्या विकेट्स गमावल्या होत्या. त्यावेळी विराट कोहली धावबाद होता-होता वाचला. लंच ब्रेक होण्याआधी जे शेवटचे षटक टाकले गेले त्या षटकातील शेवटच्या चेंडूवर पंत आणि विराट यांच्यातील ताळमेळ थोडासा बिघडताना दिसला. त्यावेळी विराटने रागाने पंतकडे पाहिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या सामन्यात जेवणाचा ब्रेक होण्याआधी मेहदी हसन मिराज याने शेवटचे षटक टाकले. पहिल्या चेंडूत रिषभ पंत (Rishabh Pant) याचा झेल सुटला. त्याच्यानंतर पाचव्या चेंडूवर पंत एकेरी धाव घेत विराट कोहली (Virat Kohli) याला स्ट्राईक दिली. त्यावेळी विराटने मिडऑनवर चेंडू टोलवला आणि धाव घेण्यासाठी पळाला. त्याचक्षणी पंतने त्याला थांबवले आणि क्रिझवर परत पाठवले. या गोंधळात विराटची विकेट जाणारच होती. तेव्हा त्याने हवेत सूर मारला आणि क्रिझवर पोहोचला.

क्रिझवर पोहचल्यानंतर विराटनेपंतकडे रागाने पाहिले. तेव्हा विराटच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. त्याच्या मतानुसार ती धाव होती. तरी पंतने वेळेवर त्याला परत पाठवले.

Charisma 🥵🔥🔥🔥🔥 Cinema ah aazha vaa Thalaiva @imVkohli pic.twitter.com/uZTZI3NyKP

— Vɪʀᴀᴛ ᴇʟᴀɴɢᴏ🇮🇳🏂/82* MCG (@ElangoAKist) December 23, 2022

पुढे विराट 73 चेंडूत 24 धावा करत बाद झाला. त्याला तस्किन अहमदने विकेटकीपर नुरूल हसन याच्याकरवी झेलबाद केले. विराट बाद झाल्यानंतर भारताची स्थिती 4 बाद 94 अशी झाली होती. त्यानंतर पंत-अय्यरने डाव सांभाळला. दोघांनीही अर्धशतकी खेळी करत टी ब्रेकपर्यंत पाचव्या विकेटसाठी 130 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे.

भारताच्या पहिल्या तिन्ही विकेट तैजुल इस्लाम यानेच घेतल्या. राहुल 10, गिल 20 आणि पुजारा 24 धावा करत बाद झाले. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली होती. त्यांचा पहिला डाव 227 धावसंख्येवर संपुष्टात आला होता. VIDEO: Rishabh Pant saved him from run out, but Virat flares up; The reaction went viral

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तू काय आता बीसीसीआयचा अध्यक्ष नाही तर…’ लाईव्ह टीव्हीवर गांगुलीला हे काय बोलून गेले गावसकर
धक्कादायक! मुंबई इंडियन्सच्या ‘या’ खेळाडूच्या मुलीला गंभीर आजार, स्पर्धेतून घेतली माघार


Next Post
Cheteshwar Pujara

भारताची दुसरी दीवार! पुजारा राखतोय भारताचा गड, टाकले ब्रॅडमन यांना मागे

Photo Courtesy: Twitter/IPL

खेळाडूंना ताफ्यात घेण्यासाठी आयपीएल संघांकडे एवढा पैसा येतो तरी कसा? एकाच क्लिकवर घ्या जाणून

Kane-Williamson

गतविजेत्या गुजरात टायटन्सची पहिली खरेदी, विलियम्सनला ताफ्यात घेण्यासाठी खर्च केले 'एवढे' कोटी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143