---Advertisement---

चेतेश्वर पुजाराची झाली या संघात निवड, जयदेव उनाडकट आहे कर्णधार

On: शुक्रवार, डिसेंबर 6, 2019 6:16 PM
---Advertisement---

9 डिसेंबरपासून रणजी ट्रॉफी या भारतातील देशांतर्गत स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने 16 जणांच्या सौराष्ट्र संघाची घोषणा केली आहे.

या संघात भारताचा कसोटीपटू चेतेश्वर पुजाराचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेआधी चांगला सराव मिळणार आहे.

तसेच सौराष्ट्र संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी जयदेव उनाडकटकडे सोपवण्यात आली आहे. तसेच या संघात शेल्डन जॅक्सन, धरमेंद्रसिंग जडेजा, हार्विक देसाई या खेळाडूंचा देखील समावेश आहे.

मागील मोसमात रणजी ट्रॉफी स्पर्धेचा उपविजेता ठरलेला सौराष्ट्र संघ या मोसमाची सुरुवात 9 डिसेंबरपासून हिमाचल प्रदेश संघाविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. या सामन्यानंतर 17 डिसेंबरपासून सौराष्ट्रचा दुसरा सामना रेल्वे विरुद्ध होईल.

असा आहे सौराष्ट्र संघ – जयदेव उनाडकट (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, शेल्डन जॅक्सन, अर्पित वासवदा, धर्मेंद्रसिंग जडेजा, कमलेश मकवाना, स्नेल पटेल, चिराग जानी, हार्विक देसाई, प्रेरक मंकड, अवि बरोट, विश्वराज जडेजा, कुशांग पटेल, चेतन सकारिया, दिव्यराज चौहान, जय चौहान.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---