---Advertisement---

‘कोहलीआधी पुजारा बनला चँपियन, कोणत्या जगात राहतोय आपण!’, सीएसकेचा विजय अन् पुजारा होतोय ट्रेंड

On: रविवार, ऑक्टोबर 17, 2021 5:06 PM
---Advertisement---

शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने विजय मिळवला. भारतीय कसोटी संघातील अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा देखील आयपीएल २०२१ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग होता. त्याला आयपीएल २०२१ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात चेन्नई सुपर किंग्स संघाने ५० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते.

दरम्यान एकही सामना खेळण्याची त्याला संधी मिळाली नाही. तरीदेखील चेन्नई सुपर किंग्स संघ विजयी झाल्यानंतर अचानक चेतेश्वर पुजारा ट्विटर वर ट्रेंड होऊ लागला आहे. काय आहे यामागील कारण? घ्या जाणून.

का होतोय चेतेश्वर पुजारा ट्रेंड?
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात असे काही दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांना आयपीएल स्पर्धेचे जेतेपद मिळवण्यात अपयश आले आहे. ज्यामध्ये विराट कोहली, एबी डिविलियर्स आणि रिषभ पंत सारख्या खेळाडूंचा समावेश आहे. परंतु, चेतेश्वर पुजाराची पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्स संघात निवड झाली आणि पहिल्याच हंगामात त्याला जेतेपद मिळवण्यात यश आले आहे. यानंतर अनेकांनी त्याची तुलना दिग्गज खेळाडूंसोबत करायला सुरुवात केली आहे.

भारतीय कसोटी संघाचा मुख्य फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या नावे आता आयपीएल स्पर्धेच्या चॅम्पियनचा टॅग लागला आहे. अनेकांनी त्याचा ट्रॉफी सोबत असलेला फोटो ट्विट केला आहे आणि त्याची तुलना थेट विराट कोहलीसोबत करायला सुरुवात केली आहे.

एका युजरने ट्विट करत लिहिले की, “चेतेश्वर पुजारा आयपीएल चॅम्पियन बनला तेही विराट कोहलीच्या आधी, कोणत्या जगात जगतोय आपण.” तर दुसऱ्या एका युजरने ट्विट करत लिहिले की, “काल आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. परंतु तुमचे लक्ष या गोष्टीवरून विचलित होऊ देऊ नका की, चेतेश्वर पुजारा आता आयपीएल चॅम्पियन आहे.”

https://twitter.com/SakshiGuptaID/status/1449586783780413442

अशी आहे चेतेश्वर पुजाराची आयपीएल कारकीर्द
आयपीएल २०१० स्पर्धेत चेतेश्वर पुजाराने कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. जिथे त्याला १० सामने खेळण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर पुढील ३ वर्ष त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करताना १४ सामने खेळले होते. तर पंजाब किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने ६ सामने खेळले.

त्यानंतर पुढील ७ वर्ष त्याला एकही फ्रँचायजीने आपल्या संघात स्थान दिले नव्हते. २०२१ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात त्याला चेन्नई सुपर किंग्स संघात स्थान देण्यात आले होते. परंतु त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत ३० सामन्यात २०.५ च्या सरासरीने ३९० धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

वुई आर द चेन्नई बॉईस! जडेजा-ब्रावोने गाणं गात साजरा केला चेन्नईचा विजय

सीएसकेला ४ ट्रॉफी जिंकवणाऱ्या ‘थाला’ला आयपीएल २०२२मध्ये रिटेन करणार? सीएसकेकडून आले उत्तर

ब्रेकिंग! शास्त्री अन् सपोर्ट स्टाफची गच्छंती निश्चित, बीसीसीआयने वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षकपदांसाठी मागवले अर्ज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---