भारतीय कसोटी संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा आता फलंदाजी करून समाधानी नाही. पुजाराला आता गोलंदाजी कौशल्ये आत्मसात करायची आहेत. रणजी ट्रॉफीमध्ये पुजाराने अष्टपैलू खेळाडू बनण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.
त्याने नुकताच रणजी सामन्यातील आपल्या गोलंदाजीचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तसेच या व्हिडिओत दिसते की पुजाराने एक विकेट घेतली आहे.
या व्हिडिओला पुजाराने कॅप्शन दिले आहे की “ज्या दिवशी मी एक फक्त फलंदाज नाही तर अष्टपैलू क्रिकेटपटू झालो. पुजाराच्या या पोस्टला सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहे.
https://www.instagram.com/p/B6lEyWejomW/
नुकत्याच झालेल्या रणजी ट्राॅफी स्पर्धेत सौराष्ट्रचा सामना उत्तर प्रदेश विरुद्ध झाला, यामध्ये सौराष्ट्रकडून खेळणाऱ्या पुजारानेही गोलंदाजीमध्ये आपला हात आजमावला होता. यूपीची पहिल्या डावात अंतिम विकेट घेण्याच्या उद्देशाने सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटने चेंडू पुजाराला दिला आणि पुजाराने दुसर्याच चेंडूवर हे काम पूर्ण केले.
पुजाराने मोहित जांगडला झेलबाद केले. त्याच्या याच विकेटचा व्हिडिओ पुजाराने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तथापि, सौराष्ट्रचा या सामन्यात यूपीकडून 72 धावांनी पराभव झाला.
पुजाराच्या या व्हिडिओवर त्याचे भारतीय संघातील संघसहकारी आर अश्विन, शिखर धवन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अश्विनने म्हटले आहे की ‘मस्त, आता आणखी गोलंदाजी करायची वेळ आली आहे.’
तसेच शिखरने गमतीने म्हटले आहे की ‘भाऊ धावतानापण कधीतरी एवढ्या वेगाने स्प्रिंट करत जा. तशी चांगली विकेट घेतली.’

https://twitter.com/Maha_Sports/status/1211225014290116610
https://twitter.com/Maha_Sports/status/1211219123566329858