---Advertisement---

WTC फायनलआधी पुजारा गाजवतोय काउंटीचे मैदान! चार सामन्यात ठोकली तीन शतके

On: शनिवार, मे 6, 2023 10:56 AM
---Advertisement---

सध्या भारताचे सर्व प्रमुख क्रिकेटपटू आयपीएलमध्ये आपले कौशल्य दाखवत आहेत. त्याचबरोबर काही खेळाडू दुखापतग्रस्त देखील झालेत. असे असतानाच कसोटी संघाचा आधारस्तंभ म्हटला जाणारा चेतेश्वर पुजारा हा इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळताना दिसतोय. ससेक्स संघाचे नेतृत्व करत असलेल्या पुजाराने चार सामन्यांमध्ये तिसरे शतक पूर्ण करत, आगामी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आपण तयार असल्याचे दाखवून दिले.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1654508028694245376?t=1pS5BTR3IXNoLrGECyFDBg&s=19

पुजारा कोणत्याही आयपीएल संघाशी करारबद्ध नाही. मागील तीन वर्षांपासून तो इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळताना दिसतो. तसेच मागील दोन वर्षापासून त्याच्याकडे ससेक्स संघाची धुरा आहे. सध्या ससेक्स आणि वूस्टरशायर यांच्या दरम्यान सामना खेळला जात असून, पुजाराने या सामन्यातही आपला दमदार फॉर्म कायम राखत 189 चेंडूंवर 136 धावांची खेळी केली. यामध्ये 19 चौकार व‌ एका षटकाराचा समावेश हे त्याच्या प्रथमश्रेणी कारकीर्दीतील 59 वे शतक ठरले. तसेच चालू काउंटी हंगामातील हे त्याचे तिसरे शतक आहे.

पुजाराने आत्तापर्यंत‌ हंगामात चार सामने खेळताना 6 डावात 468 धावा केल्या असून, यादरम्यान त्याची सरासरी 78 अशी दमदार राहिली. हंगामातील पहिल्या सामन्यात त्याने डरहॅमविरुद्ध 115 धावा केल्या होत्या.‌ यॉर्कशायरविरुद्ध त्याला अपयश आलेले. त्यानंतर ग्लॉस्टरशायरविरूद्ध त्याने 151 धावांची खेळी केली होती.

पूजा राय याच दरम्यान 6 ते 11 जून रोजी रंगणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाकडून खेळताना दिसेल. मागील वेळी भारतीय संघाला या अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलिया या अंतिम सामन्यात समोरासमोर येतील. पुजाराला इंग्लंडमध्ये खेळण्याचा सर्वाधिक अनुभव असल्याने, भारतीय संघाची मदार मोठ्या प्रमाणात त्याच्यावर असेल.

(Cheteshwar Pujara Prime Form In County Cricket For Sussex Ahead WTC Final)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

“ऍटीट्यूडमुळे मला केले गेलेले संघाबाहेर”, स्वतः हार्दिकने केला खळबळजनक खुलासा 
‘गोल्डन बॉय’ नीरजने पुन्हा उंचावली भारताची मान! डायमंड लीगमध्ये फेकला विक्रमी भाला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---