बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना गुरूवारी (22 डिसेंबर) खेळला जाणार आहे. हा सामना मीरपूरच्या शेर ए बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यामध्ये भारताच्या आर अश्विन आणि चेतेश्वर पुजारा यांना मोठे विक्रम मोडण्याची संधी आहे. भारत आधीच या मालिकेतील पहिला सामना जिंकत 1-0 असा आघाडीवर आहे.
आर अश्विन कसोटीमध्ये 3000 धावांचा टप्पा गाठण्यापासून केवळ 11 धावाच दूर आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पाहिले तर 3000 धावांचा टप्पा काहीच अष्टपैलू खेळाडूंनी गाठला आहे. यामध्ये भारताचा दिग्गज कपिल देव, ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न, दक्षिण आफ्रिकेचा शॉन पोलक आणि न्यूझीलंडचा रिचर्ड हॅडली यांचा समावेश आहे. या खेळाडूंनी कसोटीमध्ये 3000 पेक्षा अधिक धावा केल्या असून 400 पेक्षा अधिक विकेट्सही घेतल्या आहेत.
कसोटीमध्ये 450 कसोटी विकेट घेण्यापासून अश्विनला केवळ 7 विकेट्सची आवश्यकता आहे. भारताकडून कसोटीमध्ये सर्वप्रथम 450 विकेट्स घेण्याची कामगिरी अनिल कुंबळे यांनी केली आहे. कुंबळेने 93व्या सामन्यात अशी कामगिरी केली होती. त्याने 2005मध्ये पाकिस्तानविरुद्ध 450 विकेट्सचा टप्पा ओलांडला होता.
श्रीलंकेचा दिग्गज मुरलीधरन याने 2003मध्ये 80व्या सामन्यात 450 विकेट्स घेतल्या होत्या आणि कसोटीमध्ये जलद 450 विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. अश्विनची कामगिरी पाहिली तर त्याने आतापर्यंत 87 कसोटी सामने खेळताना 30 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. यामुळे त्याने आतापर्यंत 443 विकेट्स घेतल्या आहेत.
अश्विनबरोबरच चेतेश्वर पुजारा याच्याकडेही दिग्गजांच्या पंक्तित बसण्याची संधी आहे. त्याने बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत 16वी धाव घेताच त्याचे कसोटीमध्ये 8000 धावा पूर्ण होतील. कसोटीमध्ये 8000 धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली आणि सौरव गांगुली यांचा समावेश आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘पुन्हा असे केले तर थेट घरीच’, जेव्हा संघाचे नेतृत्व करताना सचिनने खेळाडूला दिली चेतावणी
ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडचे चालू सामन्यात लाजीरवाणे कृत्य, चारचौघात मागावी लागली माफी