नुकताच फिफा विश्वचषक (FIFA World Cup) 2022ची स्पर्धा पार पडली. अंंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रांसचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ( पूर्ण वेळ 3-3) असा पराभव करत तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. सोशल मीडियावर पाहिले तर अनेकांनी अर्जेंटिनाचे समर्थन केले. अर्जेंटिनाचा स्टार लिओनल मेस्सी (Lionel Messi)जिंकल्याने तर चाहत्यांचा आनंद ओसंडून वाहू लागला. असाच काहीसा आनंद बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन यानेही व्यक्त केला. याचे फोटो आणि व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत.
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात दुसरा कसोटी सामना गुरूवारी (22 डिसेंबर) ढाका येथे खेळला जाणार आहे. शाकिब हा मेस्सीचा किती मोठा चाहता आहे हे संघाच्या सरावावेळी दिसले. त्याने सरावादरम्यान मेस्सीचा क्रमांक असलेली अर्जेंटिनाची जर्सी घातली आणि फुटबॉलही खेळला.
बांगलादेश अर्जेंटिनाचा किती मोठा चाहता आहे हे अनेकदा दिसले आहे. आता कतारमध्ये सुरू असलेल्या या फुटबॉल विश्वचषकावेळी जेव्हा-जेव्हा मेस्सी आणि अर्जेंटिना चांगली कामगिरी करत होते, तेव्हा-तेव्हा बांगलादेशचे त्याचे सेलेब्रेशन करत होता. या घटनेचे असंख्य फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले ज्यामध्ये बातम्या देणाऱ्यांनीदेखील अर्जेंटिनाची जर्सी घातली होती. त्याचबरोबर देशात ठिकठिकाणी अर्जेंटिनाचे झेंडेही दिसले.
पहिल्या कसोटीच्या वेळी शाकिबच्या फिटनेसवर चिंता व्यक्त केली जात होती. कारण त्याने त्या कसोटीत केवळ 12 षटके गोलंदाजी केली होती. हा सामना यजमानांनी 188 धावांनी गमावला होता. आता दुसऱ्या कसोटीसाठी चांगली तयारी करताना तो दिसत आहे. त्याने पहिल्या कसोटीत बांगलादेशच्या दुसऱ्या डावात 84 धावांची तुफानी खेळी केली होती.
भारताच्या संघातही दुखापतग्रस्त खेळाडूंचे प्रमाण वाढत आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा त्याच्या हाताच्या अंगठच्या दुखापतीतून अद्याप सावरला नाही. यामुळे तो दुसऱ्या कसोटीत खेळणार नाही. त्याचबरोबर नवदीप सैनीही दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. भारताला दुसरा कसोटी सामना जिंकणे आवश्यक आहे, कारण संघ आयसीसी कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियानंतर दुसऱ्या स्थानावर आहे. BANvIND Second Test Shakib Al Hasan plays football in Argentina Jersey
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष- क्रिकेटर के श्रीकांत
सिंधूची ‘सुवर्ण’ प्रतिक्षा संपली, भारताच्या शटलर्सची बीडब्ल्यूएफमध्ये दैदिप्यमान कामगिरी