Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लेकाने विश्वचषक जिंकताच थेट मैदानात धावली आई, आनंदाच्या भरात मेस्सीला मारली मिठी

लेकाने विश्वचषक जिंकताच थेट मैदानात धावली आई, आनंदाच्या भरात मेस्सीला मारली मिठी

December 19, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Lionel Messi

Photo Courtesy: Twitter/ Screengrab


रविवारी (18 डिसेंबर) लोओनल मेस्सी ( Lionel Messi ) याच्या नेतृत्वातील अर्जेंटिना संघ फीफा विश्वचषक 2022 चा विजेता संघ बनला. अर्जेंटिनाच्या इतिहासातील हा त्यांचा तिसरा फीफा विश्वचषक ठरला आहे. अर्जेंटिनाने मागच्या 36 वर्षांचा दुष्काळ संपवून यावेळी विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी 1978 आणि 1986 साली अर्जेंटिनाने विजेतेपद जिंकले होते. रविवावीर मेसीच्या नेतृत्वाखाली संघ पुन्हा एकदा जगज्जेता बनला आणि सर्वत्र त्याचे कौतुक होऊ लागले. मेस्सीचे हे यश त्यांच्या कुटुंबीयांसाठीही महत्वाचे होते. त्याच्या आईचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

फ्रांस आणि अर्जेंटिना (Argentina vs France) यांच्यातील हा सामना करतच्या लुसैल स्टेडियमवर खेळला गेला. निर्धारित 90 मिनिटांमध्ये सामना निकाली निघू शकला नाही. फस्ट हाफमध्ये अर्जेंटिना 2-0 अशा आघाडीवर होती. मात्र, सेकंड हाफमध्ये फ्रांसने 2-2 अशी बरोबरी साधली आणि पंचांनी वेळ वाढवून दिला. त्यानंतर अतिरिक्त मिळाळेल्या वेळात मेसीने संघाला पुन्हा एकदा 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. पण एम्बाप्पेने हा वेळ संपण्यापूर्वी पुन्हा एकदा 3-3 अशी बरोबरी साधली आणि सामना बरोबरीवर सोडवला. याच कारणास्तव सामन्याचा निगाल पेनल्टी शूटआउटवरून ठरवला गेला.

पेनल्टी शूटआउटमध्ये अर्जेंटिनाने ४, तर फ्रांसने 2 गोल केले. परिणामी अर्जेंटिना तिसऱ्यांना जगज्जेता ठरला. विजयानंतर मेसी आणि अर्जेंटिना संघ मैदानात जल्लोष करत होता. तितक्यात मेसीची आईने मैदानात धावत आली आणि तिने मुलाला घट्ट मिठी मारली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते आई आणि मुलामधील हे प्रेम पाहून भारावून गेले आहेत. व्हिडिओवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

Messi's mother after Messi winning the #WorldCupFinal 🥺#ArgentinaVsFrance #Messi𓃵 #Argentina #GOAT𓃵 pic.twitter.com/H0bOD4VmrY

— Arafat Rahman (@ArafatR05018919) December 18, 2022

Messi's mother comes and hugs him. A mother's pride pic.twitter.com/wgSwisREkR

— Hernán Federico Pacheco (@hernanfpacheco) December 18, 2022

दरम्यान, मेस्सीने या सामन्यात अर्जेंटिनानसाठी सर्वाधिक 2 गोल केले. तसेच पेनल्टी शुटआउटमध्ये देखील त्याने एका गोलचे योगदा दिले. विश्वचषक 2022 मधील मेसेचे एकंदरीत प्रदर्शन चांगले राहिले असून, यासाठी त्याला गोल्डन बॉल पुरस्कार देखील मिळाला. दुसरीकडे फ्रांसची एम्बाप्पेने विश्वचषका सर्वाधिक गोल केल्यामुळे गोल्डन बूटाचा मानकरी ठरला.  (Lionel Messi’s mother came into the field and gave him a big hug)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हे वागणं बरं नव्हं! गोल्डन ग्लोव विजेत्याकडून अश्लील कृत्य, नेटकरी भलतेच संतापले
अर्जेंटिनाच्या विश्वविजयाचे स्वप्न साकार करणारा मार्टिनेझ ठरला गोल्डन ग्लोव्हजचा मानकरी; अशी आहे आजवरची यादी 


Next Post
Photo Courtesy: Twitter/PCB

अझर अलीच्या शानदार कारकिर्दीची दुर्दैवी अखेर; शेवटच्या डावात फुटला नाही भोपळा

Photo Courtesy: Twitter/Kerala Congress

फुटबॉल वर्ल्डकप ट्रॉफी नेण्याचा मान दीपिकालाच कसा मिळाला? काय होतं कारण? घ्या जाणून

rohit-sharma-rahul-dravid

रोहित आणि द्रविडचं भविष्य 'या' तारखेला ठरणार! बीसीसीआय टी-20 क्रिकेटसाठी घेऊ शकते मोठा निर्णय

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143