---Advertisement---

विक्रमी द्विशतक करत चेतेश्वर पुजाराने केले हे खास ५ पराक्रम…

---Advertisement---

भारतीय कसोटी संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने रणजी ट्राॅफीमध्ये खेळताना खास विक्रम केले आहेत. रणजी ट्राॅफी स्पर्धेत सौराष्ट्रकडून खेळणार्‍या चेतेश्वर पुजाराने रविवारी(12 जानेवारी) कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात प्रथम श्रेणी कारकीर्दीतील 13 वे द्विशतक पूर्ण केले आहे. 

त्याने कर्नाटककडून खेळताना पहिल्या डावात 390 चेंडूत 24 चौकार आणि 1 षटकारासह 248 धावा केल्या. तसेच त्याने शेल्डन जॅक्सन बरोबर तिसऱ्या विकेटसाठी 394 धावांची भागीदारी रचली. जॅक्सनने 161 धावांची शतकी खेळी केली. त्यांच्या या भागीदारीमुळे कर्नाटकने पहिला डाव 7 बाद 581 धावांवर घोषित केला.

पुजाराने ही द्विशतकी खेळी करताना अनेक मोठे विक्रम केले आहेत. ते विक्रम असे –

#कर्नाटकविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक द्विशतके करणारा पुजारा दुसराच फलंदाज आहे. याआधी असा पराक्रम केवळ व्हीव्हीएस लक्ष्मणने केला आहे. लक्ष्मणने पण कर्नाटकविरुद्ध 2 प्रथम श्रेणी द्विशतके केली आहेत.

#200 वा प्रथम श्रेणी सामना खेळण्याआधी 13 द्विशतके करणारा पुजारा केवळ तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याचा कर्नाटक विरुद्धचा सामना हा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 198 वा सामना आहे. याआधी असा पराक्रम केवळ सर डॉन ब्रॅडमन आणि बिल पॉन्सफोर्ड यांनी केला आहे. ब्रॅडमन यांनी 13 वे द्विशतक 71 व्या सामन्यात केले होते. तसेच पॉन्सफोर्ड यांनी 157 व्या सामन्यात 13 वे द्विशतक केले होते.

#रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक द्विशतके करणारे क्रिकेटपटू – 

9 – पारस डोग्रा

7 – अजय शर्मा

7 – चेतेश्वर पुजारा

6 – सुरेंद्र भावे

6 – अभिनव मुकुंद

6 – अशोक मल्होत्रा

#प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके करणारे आशियाई क्रिकेटपटू – 

13 – चेतेश्वर पुजारा

13 – कुमार संगकारा

12 – युनूस खान

12 – जावेद मियाँदाद

11 – विजय मर्चंट

#प्रथम श्रेणीमध्ये सर्वाधिक शतके करणारे भारतीय क्रिकेटपटू – 

81 – सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर

68 – राहुल द्रविड

60 – विजय हजारे

57 – वासिम जाफर

55 – दिलीप वेंगसकर, व्हीव्हीएस लक्ष्मण

54 – मोहम्मद अझरुद्दिन

50 – चेतेश्वर पुजारा

#चेतेश्वर पुजाराने रणजी ट्रॉफीमध्ये 6000 धावा पूर्ण करण्याचाही टप्पा या द्विशतकी खेळी दरम्यान पार केला आहे. हा टप्पा पार करणारा तो 50 वा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आता रणजी ट्रॉफीमध्ये 6011 धावा झाल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---