जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी उड्डाण भरणार आहे. तिथे त्यांना सुरुवातीला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. १८ ते २२ जून दरम्यान द रोज बाउल स्टेडियम, साउथम्पटन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात हा महामुकाबला होणार आहे. त्यानंतर ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ इंग्लंडशी दोन हात करणार आहे. तत्पुर्वी ‘कसोटी स्पेशलिस्ट’ चेतेश्वर पुजारा याने भारतीय संघाच्या नव्या जर्सीचा फोटो चाहत्यांच्या भेटीला आणला आहे.
पुजाराने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर भारतीय संघाच्या नव्या जर्सीचा फोटो पोस्ट केला आहे. त्याने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये भारतीय संघाची नवी जर्सी पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या संमिश्रणाने बनली असल्याचे दिसत आहे. यावर एका बाजूला निळ्या रंगामध्ये बीसीसीआयचा लोगो; तर दुसऱ्या बाजूला आयसीसी जागतिक कसोटी अंजिक्यपद अंतिम सामना २०२१ असे लिहिलेले आहे. याबरोबरच पुढे मोठ्या अक्षरात ‘इंडिया’ असे नाव टाकले आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याची आतुरता व्यक्त केली आहे. त्याने लिहिले आहे की, ‘नवीन किट आला आहे. आता मैदानावर उतरण्यासाठी खूप उस्तुक आहे.’
पुजारापुर्वी अष्टपैलू रविंद्र जडेजाने भारतीय संघाच्या कसोटी स्वेटरचा फोटो शेअर केला होता. या स्वेटरमध्ये ९०च्या दशकातील अर्थातच पारंपारिक अंदाजातील भारताच्या कसोटी सामन्यासाठी असलेल्या स्वेटरची झलक दिसत होती. त्या स्वेटरला कॉलर आणि हाताची बाही नसून साधारणत तो एक हाफ स्वेटर होता.
https://www.instagram.com/p/CPdOnWwjXh8/?utm_source=ig_web_button_share_sheet
थोडक्यात भारतीय क्रिकेटपटू कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात आतमध्ये आधुनिक जर्सी घालून त्यावर पारंपारिक अंदाजातील स्वेटरही घालू शकतात.
⏪Rewind to 90’s 👕 #lovingit #india pic.twitter.com/bxqB6ptfhD
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) May 29, 2021
भारतीय संघाचा ही नवीकोरी जर्सी प्रायोजक एमपीएल स्पोर्ट्सने डिजाईन केली आहे. बीसीसीआयने नोव्हेंबर २०२० मध्ये एमपीएल स्पोर्ट्सला भारतीय संघाचा नवा प्रायोजक म्हणून निवडले होते.
भारतीय क्रिकेट संघासाठी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे. साधारणत: २०१९ मध्ये आयसीसीने या स्पर्धेला सुरुवात केली होती. त्यानंतर मागील २ वर्षांत प्रदर्शनात सातत्य राखत भारतीय संघाने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. आता भारतीय संघाकडे न्यूझीलंडला पराभूत करत पहिलावहिला कसोटी अजिंक्यपद चषक आपल्या नावे करण्याची सुवर्णसंधी असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या जर्सीत, पाहून आठवतील जुने दिवस
बापमाणूस गमावला; आता भूवीच्या आईचीही तब्येत नाजूक, रुग्णालयात आहेत भरती
लग्नाची अनोखी गोष्ट! मैदानातून थेट गाठला लग्नमंडप; संघाला विजयी करूनच पठ्ठ्या चढला बोहल्यावर