नुकतेच भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांनी आपापले कसोटी सामने जिंकले. यामध्ये तिन्ही संघांच्या खेळांडूनी उत्तम कामगिरी केली. हे सामने संपल्यावर आयसीसीने बुधवारी (21 डिसेंबर) कसोटी फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली. ज्यामध्ये भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि शुबमन गिल यांनी बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शतकी खेळी केली. ज्यामुळे त्यांना कसोटी क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारताच्या चेतेश्वर पुजारा, शुबमन गिल, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना फायदा झाला आहे. पुजाराने बांगलादेशविरुद्ध 90 आणि नाबाद 102 धावांची खेळी केली. ज्यामुळे तो ताज्या आयसीसी फलंदाजी क्रमवारीत 16व्या स्थानी पोहोचला आहे. शुबमन गिल यानेही बांगलादेशविरुद्ध त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक केले. आता तो 54व्या स्थानावर आला. त्याने बांगलादेशविरुद्ध 20 आणि 110 धावा केल्या. श्रेयस अय्यर यानेही क्रिकेटच्या या दिर्घ प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केली. ज्यामुळे त्याने 11 स्थानांची झेप घेत 26वे स्थान गाठले आहे.
दुसरीकडे, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला सर्वाधिक फायदा झाला आहे. तो त्याच्या कारकिर्दीच्या सर्वोत्तम दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध खेळताना तीन अर्धशतक आणि एक शतक केले. त्यामुळे त्याचे 875 रेटिंग पॉइंट झाले. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅब्यूशेन याने पहिले स्थान काबिज केले आहे. त्याचे 936 पॉइंट्स आहेत.
गोलंदाजांची क्रमवारी पाहिली तर दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा हा एकमेव गोलंदाज ठरला ज्याला फायदा झाला आहे. त्याने चार स्थान पुढे जात तिसरा क्रमांक गाठला आहे. त्याने ब्रिस्बेन कसोटीमध्ये प्रत्येक डावात चार विकेट्स घेतल्या. भारताकडून अक्षर पटेल याने कारकिर्दीत प्रथमच पहिल्या वीसमध्ये स्थान मिळवले आहे. त्याने 18वे स्थान गाठले आहे. कुलदीपने चट्टोग्राम कसोटीमध्ये कारकिर्दीत उत्तम कामगिरी करत 19 स्थानांनी उडी घेत 49वे स्थान गाठले आहे.
On the up 📈
Babar Azam achieves yet another milestone in the latest @MRFWorldwide ICC Men's Test Player Rankings 👏https://t.co/06H1QIqUjO
— ICC (@ICC) December 21, 2022
अष्टपैलूच्या क्रमवारीत बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला मागे टाकले आहे. शाकिबने तिसरे स्थान गाठले असून या क्रमवारीत भारताचा रविंद्र जडेजा पहिल्या स्थानावर कायम आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुजारा-अश्विनची नजर कपिल देव आणि सचिन तेंडुलकरच्या विक्रमांवर, बांगलादेशविरुद्ध इतिहास रचण्याची संधी
यंदाच्या लिलावावर आरसीबीचे खास लक्ष, ‘या’ खेळाडूंना सामील करु शकतात गोटात