---Advertisement---

VIDEO। शांत अन् संयमी पुजाराचा रौद्रावतार पाहिलात का? गोलंदाजाची केलीये कडक धुलाई

On: शनिवार, ऑगस्ट 13, 2022 3:37 PM
Cheteshwar-Pujara-Smashe
---Advertisement---

भारताचा कसोटी क्रिकेटसाठी प्रसिद्ध असणारा फलंदाज चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लंडमध्ये धुमाकूळ घालत आहे. तो सध्या इंग्लंडमधील रॉयल लंडन चषक २०२२च्या वनडे प्रकारात ससेक्स संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. या वेळी त्याने आपल्या फंलदाजीच्या जोरावर सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. विशेष म्हणजे यॉर्किशायर विरुद्धच्या सामन्यात त्याने एका षटकात तब्बल २२ धावा कुटल्या. पुजाराच्या या तुफान फलंदाजीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

सध्या सुरू असलेल्या रॉयल लंडन चषक २०२२ मध्ये ससेक्सचे प्रतिनिधीत्व करत असलेला भारतीय स्टार चेतेश्वर पुजारा याने शुक्रवारी वॉर्विकशायरविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याचा स्फोटक अवताराचे प्रदर्शन केले. पुजाराने आपल्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर संपूर्ण एजबैस्टनच्या मैदानात रोमांच उभा केला. रोमहर्षक लढतीत पुजाराने ७९ चेंडूत १०७ धावा करत एका षटकात २२ धावा केल्या.

ससेक्सच्या धावसंख्येच्या ४५व्या षटकात हे सर्व घडले जेव्हा पुजाराने मध्यमगती गोलंदाज लियाम नॉर्वेलला क्लीनर्सकडे नेले आणि तीन चौकार आणि एक षटकार मारला.

असा होता ४५व्या षटकाचा आलेख
४४.१: चौकार.
४४.२:२ धावा.
४४.३: चैकार.
४४.४: २ धावा.
४४.५: षटकार.
४४.६: चौकार.

चेतेश्वर पुजाराने डावात ७९ चेंडूंचा सामना करत १०७ धावा केल्या. यादरम्यान त्याने ७ चौकार आणि २ षटकार मारले. सलामीवीर फलंदाज अली ओरनेही १०२ चेंडूत ८१ धावा केल्या. मात्र, मधल्या फळीला चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे संघ लक्ष्यापासून ४ धावा दूर राहिला. वॉर्विकशायरसाठी क्रुणाल पांड्या सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. या डावखुऱ्या फिरकीपटूने १० षटकांत ५१ धावा देत ३ बळी घेतले.

या सामन्यात वॉर्विकशायरचा कर्णधार विल रोड्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर फलंदाज रॉय येट्सने शानदार शतक झळकावले. त्याने १११ चेंडूंचा सामना करत ११४ धावा केल्या. १४ चौकार आणि २ षटकार मारले. कर्णधार रोड्सने ७० चेंडूत ७६ आणि मिचेल बर्गेसने ५१ चेंडूत ५८ धावांचे योगदान दिले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नियम अधिक कडक! आता खेळाडूंना सोसावा लागणार भुर्दंड

Asia Cup: आता अफगाणिस्तानचं काही खरं नाही! टी२०तील दिग्गज गोलंदाजच आऊट ऑफ फॉर्म

Asia Cup: आता अफगाणिस्तानचं काही खरं नाही! टी२०तील दिग्गज गोलंदाजच आऊट ऑफ फॉर्म

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---