---Advertisement---

सात वर्षांनंतर पुजारा खेळणार आयपीएल, ‘या’ संघाने लावली ५० लाखांची बोली

On: गुरूवार, फेब्रुवारी 18, 2021 6:26 PM
---Advertisement---

चेन्नई येथे आयपीएलच्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव सुरू आहे. त्याला मध्ये अनेक विदेशी खेळाडूंना कोट्यावधी रुपयांच्या बोल्या लागल्या. के गौतम आणि शाहरुख खान यासारख्या देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडूंनी देखील मोठी रक्कम घेत सर्वांना चकित केले. भारताच्या कसोटी संघाचा आधारस्तंभ चेतेश्वर पुजारा याच्यावर देखील बोली लागल्याने सर्वांना सुखद धक्का बसला.

या संघासाठी खेळणार पुजारा

सध्या भारतीय कसोटी संघाचा सर्वात मुख्य खेळाडू असलेला चेतेश्वर पुजारा हा देखील २०२१ च्या आयपीएल लिलावासाठी उतरला होता. त्याची आधारभूत किंमत ५० लाख इतकी होती. त्याचे नाव आल्यानंतर, काही वेळ कोणत्याही संघाने त्यावर बोली लावली नाही. मात्र, अचानकपणे एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने त्यावर बोलू लावत, सर्वांना आश्चर्यचकित केले. लिलावकर्त्याने ‘पुजारा विकला गेला’ हे जाहीर केल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

सात वर्षानंतर खेळणार आयपीएल

भारताच्या कसोटी संघाचा अविभाज्या घटक असलेला पुजारा यापूर्वी अखेरच्या वेळी २०१४ साली आयपीएलमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी, त्याने किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तत्पूर्वी, पुजारा केकेआर व आरसीबी संघांसाठी आयपीएल खेळला आहे. पुजाराने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ३० सामने करताना ३९० धावा काढल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---