गेल्या कित्येक महिन्यांपासून क्रिकेट चाहते विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची वाट पाहत आहेत. हा सामना येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला विजययाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. परंतु अनेकांना असा ही प्रश्न पडला असेल की, असा कुठला फलंदाज आहे, जो या सामन्यात मोठी खेळी करू शकतो. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटूने याबाबत भाष्य केले आहे.
भारतीय संघासाठी २५ कसोटी सामने आणि ३८ वनडे सामने खेळलेल्या माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने अशा फलंदाजाची निवड केली आहे, जो फलंदाज आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघासाठी जास्त धावा करेल.
पार्थिव पटेलने स्टारस्पोर्ट्सच्या एका शोमध्ये म्हटले की, “भारतीय संघाला जर या सामन्यात विजय मिळवायचा असेल. तर पुजारने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी यायला हवं. जर तो ३ ते ४ तास फलंदाजी करतो तर, भारतीय संघ मजबूत स्थितीत असेल. माझ्या मते पुजारा या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “क्रिकेटमधील तर्क बाजूला ठेवून, मी सामन्यात भारतीय संघाला समर्थन करेल. मला असे वाटते की, भारतीय गोलंदाजी आक्रमणात मोहम्मद शमीची भूमिका महत्वाची असणार आहे.”
इरफान पठाणने ही मांडले आपले मत
या सामन्यापूर्वी इरफान पठाणने ही आपले मत मांडले आहे. तो म्हणाला, “विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना हा आतापर्यंतचा सर्वात मोठा कसोटी सामना आहे. माझ्या मते या सामन्यात न्यूझीलंड संघ ५० ते ५५ टक्के फायद्यात असेल.तर कर्णधार केन विलियमसन या सामन्यात सर्वाधिक धावा करेल. तसेच मोहम्मद शमी किंवा ट्रेंट बोल्ट हे सर्वाधिक गडी बाद करतील.”
महत्त्वाच्या बातम्या –
WTC Final: न्यूझीलंडच्या ‘या’ गोलंदाजापासून पुजाराला आहे धोका; आत्तापर्यंत ४ वेळा केलंय बाद
न्यूझीलंड संघासाठी धोक्याची घंटा!! संघातील ‘हे’ २ प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे होऊ शकतात संघाबाहेर






