---Advertisement---

पुजाराची ही कामगिरी पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल आणि म्हणाल, भाऊ… अजून किती दिवस चालायचं हे?

On: शुक्रवार, ऑगस्ट 13, 2021 5:30 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाची भिंत मानल्या जाणाऱ्या मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराचा खराब फॉर्म सुरूच आहे. इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यातही तो धावा करण्यात अपयशी ठरला. पहिल्या डावात 9 धावा केल्यावर पुजारा बाद झाला. शेवटच्या 10 कसोटी डावांमध्ये त्याने फक्त एकदा 20 धावा केल्या आहेत. गेल्या काही मालिकांपासून त्याची कामगिरी ही चिंतेची बाब बनली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी (12ऑगस्ट) पासून लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुरू झाला. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी शानदार शतकी भागीदारी करून संघाची चांगली सुरुवात केली. रोहितचे शतक हुकले आणि त्यानंतर चेतेश्वर पुजाराने मैदानावर पाऊल ठेवले. चांगले वातावरण निर्माण केल्यानंतर या फलंदाजाकडून मोठी खेळी करणे अपेक्षित होते, पण तो फ्लॉप ठरलै.

एकेकाळी भारतीय संघाची भिंत म्हटल्या जाणारा पुजारा आता धावा काढण्यासाठी तळमळत आहे. शेवटच्या 10 कसोटी डावांमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 21 धावा आहे. पुजाराला शतक झळकायला आता 30 पेक्षा जास्त डाव झाले आहेत. गेल्या 10 डावांमध्ये त्याने 7, 0, 17, 8, 15, 4, 12, 9 धावा केल्या आहेत. 2021 मध्ये आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळल्यानंतर त्याने 27.78 च्या सरासरीने फक्त 389 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 77 धावा आहे. 2020 मध्ये पुजाराने केवळ 4 कसोटींमध्ये 20.37 च्या सरासरीने 163 धावा केल्या.

2019 मध्ये शेवटचे शतक झळकावले
पुजाराच्या बॅटसह शेवटचे शतक 2019 मध्ये दिसले होते. सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 193 धावांची खेळी करत त्याने केली होती. या शेवटच्या शतकानंतर आतापर्यंत तो धावांची शंभरी गाठू शकलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

अतिउत्तम! लॉर्ड्सच्या मैदानावर तळ ठोकत राहुलची शतकाला गवसणी, सहकाऱ्यांनी ‘असा’ केला जल्लोष

अरे बापरे..! अंधारामुळे बाद झाला रोहित शर्मा? वाचा नेमकं काय घडलं ते….

सलामीवीर म्हणून रोहितचाच बोलबाला! वाचा ‘ही’ आकडेवारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---