महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2023) च्या दुसऱ्या सामन्यात ईगल नाशिक टायटन्स संघाने छत्रपती संभाजी किंग्सचा (सीएसके) 4 धावांनी पराभव केला. संघाला चार धावांनी पराभव पत्करावा लागला असला तरी, सीएसकेचा कर्णधार राजवर्धन हंगरगेकर याने छोटेखानी खेळी करत सर्वांना आपल्या फलंदाजीने मंत्रमुग्ध केले.
https://www.instagram.com/reel/CtjYoSlAZBx/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
या सामन्यात सीएसकेला 196 धावांचे लक्ष मिळाले होते. मात्र, पावसामुळे हे आव्हान अखेरीस 15 षटकात 157 असे करण्यात आले होते. सलामीवीरांनी चांगली कामगिरी केल्यानंतर मधल्या फळातील फलंदाजांनी कच खाल्ली. बाराव्या षटकातील पहिल्या चेंडूवर अभिषेक पवार बाद झाल्यानंतर राजवर्धन हंगरगेकर मैदानावर उतरला. त्यावेळी त्यांना विजयासाठी 52 धावांची आवश्यकता होती. अखेरच्या दोन षटकात संघाला 38 धावांची गरज असताना राजवर्धन याने नाशिकचा गोलंदाज इझान सईदच्या गोलंदाजीवर आक्रमण चढवले. पहिल्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरमधून षटकार खेचल्यानंतर त्याने, तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा तोच फटका मारत सहा धावा वसूल केल्या. तर चौथ्या चेंडूवर समोरच्या दिशेने षटकार मारून त्याने सामन्याचे समीकरण बदलले. मात्र, दुर्दैवाने पाचव्या चेंडूवर तो झेलबाद झाला. अखेरच्या षटकात 16 धावा काढण्यात इतर फलंदाजांना अपयश आल्याने संघाला चार धावांनी पराभूत व्हावे लागले.
या सामन्याचा विचार केल्यास अर्शिन कुलकर्णीच्या 60 व हर्षद खडीवाले याच्या 43 व धनराज शिंदेंच्या नाबाद 35 धावांमुळे नाशिकने 195 धावा केल्या होत्या. सीएसकेसाठी ट्रंकवाला व नवले यांनी दमदार सुरुवात केली. मात्र, प्रशांत सोलंकी व इतर गोलंदाजांनी योग्यवेळी टिच्चून गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. अर्शिन कुलकर्णी सामन्याचा मानकरी ठरला.
(Chhatrapati Sambhaji Kings Captain Rajvardhan Hangargekar Hits 3 Sixes In MPL 2023)
महत्वाच्या बातम्या-
चेतन शर्मा पुन्हा बनले निवडकर्ते! IPLच्या फ्लॉप खेळाडूला बनवून टाकलं संघाचा कर्णधार, वाचाच
Ashes मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे पाच गोलंदाज, यादीतील दोघांनी घेतलाय जगाचा निरोप