पुणे – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत आठव्या दिवशी पहिल्या लढतीत दिग्विजय पाटील(नाबाद ४८) व दिग्विजय जाधव(नाबाद २०)यांनी केलेल्या सयंमपूर्ण अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर छत्रपती संभाजी किंग्स संघाने ४एस पुणेरी बाप्पा संघाचा ७ गडी राखून पराभव करत तिसरा विजय मिळवला.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत विजयासाठी छत्रपती संभाजी किंग्स संघाला १४५धावांचे आव्हान होते. सलामवीर सौरभ नवले ६धावांवर तंबूत परतला. ओमकार खाटपे(३०धावा) व ओम भोसले(२७धावा)यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३४चेंडूत ५०धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. आठव्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर ओम भोसले २७धावांवर झेल बाद झाला. रोशन वाघसरेने त्याचा बळी घेत अडसर दुर केला. त्यानंतर दिग्विजय पाटीलने ३२चेंडूत नाबाद ४८धावांची संयमी खेळी केली. त्याने ९चौकार मारले. दिग्विजय पाटील व ओमकार खाटपे(३०धावा)यांनी चौथ्या विकेटसाठी ३८चेंडूत ५२ धावांची भागीदारी करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, ४एस पुणेरी बाप्पा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. छत्रपती संभाजी किंग्सच्या यतीन मंगवाणी(२-२८), आनंद ठेंगे(१-२३), हितेश वाळुंज(१-३०)यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे ४एस पुणेरी बाप्पा संघाला २०षटकात ५बाद १४५धावापर्यंत मजल मारली. पवन शहाने ४३चेंडूत ४६धावांची खेळी करून संघाला सुरेख सुरुवात करून दिली. त्याने ३चौकार व २षटकार मारले. पण एकाबाजूने शुभम तैस्वाल(८), अभिमन्यू जाधव(७)हे झटपट बाद झाले. त्यानंतर यश क्षीरसागर १५, सुरज शिंदे नाबाद १५ यांनी धावा केल्या.
निकाल: साखळी फेरी:
४एस पुणेरी बाप्पा: २०षटकात ५बाद १४५धावा(पवन शहा ४६(४३,३x४,२x६), साहिल औताडे ३९(२१,२x४,३x६), यश क्षीरसागर १५, सुरज शिंदे नाबाद १५, यतीन मंगवाणी २-२८, आनंद ठेंगे १-२३, हितेश वाळुंज १-३०) पराभुत वि.छत्रपती संभाजी किंग्स: १८.१ षटकात ३बाद १४८धावा(दिग्विजय पाटील नाबाद ४८(३२,९x४), ओमकार खाटपे ३०(२८,२x४,१x६), दिग्विजय जाधव नाबाद २०, ओम भोसले २७, सोहम जमाले १-२७, रोशन वाघसरे १-२९);सामनावीर – दिग्विजय पाटील;