-अनिल भोईर
छत्रपती शिवाजी महाराज चषक वरिष्ठ पुरुष व महिला गट आंतर राज्य कबड्डी स्पर्धा-२०१८ स्पर्धेला आजपासून होणार सुरुवात. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. यांच्यावतीने सांगली जिल्हा कबड्डी असो. “छत्रपती शिवाजी महाराज चषक वरिष्ठ पुरुष व महिला गट आंतर राज्य कबड्डी स्पर्धेचे” आज प्रारंभ होईल.
जयंत पाटील खुले नाट्यगृह मैदान, ताकारी रोड, इस्लामपूर, जिल्हा सांगली येथे यास्पर्धेच आयोजन केलं आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो व विदर्भ कबड्डी असो. संघ स्पर्धेत सहभागी होत आहेत. पुरुषांचे १६ व महिलांचे १६ असून त्याचं ४-४ गटात विभाजन केलं आहे.
आज स्पर्धेचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाल्या नंतर पुरुष विभागात रायगड विरुद्ध बीड व सांगली विरुद्ध अहमदनगर या सामन्यानी सुरुवात होईल. तर महिला विभागात पुणे विरुद्ध सातारा व मुंबई उपनगर विरुद्ध रायगड या सामान्यांनी स्पर्धेची सुरुवात होईल. आज पुरुष व महिला विभागात प्रत्येकी १० सामने खेळवण्यात येतील.
उद्घाटनाचे सामने पुरुष विभाग
१) रायगड विरुद्ध बीड
२) सांगली विरुद्ध अहमदनगर
उद्घाटनाचे सामने महिला विभाग
१) पुणे विरुद्ध सातारा
२) मुंबई उपनगर विरुद्ध रायगड
महत्त्वाच्या बातम्या:
–संपूर्ण यादी: आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी
–आयपीएल लिलावातील एवढे पैसे पाहुन त्या खेळाडूला आले टेन्शन
–७ तासांत आयपीएलमध्ये १०६ कोटींची उधळणं
–माझं धोनीबद्दलचं मत कधीच बदलणार नाही- गौतम गंभीर