fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

संपूर्ण यादी: आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी

जालना | महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यावर्षी महाराष्ट्रीतील जालना शहरात होत आहे. यावर्षी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज मल्ल या स्पर्धेत आपल नशीब आजमावत आहेत.

गेल्यावर्षी पुण्यातील भूगाव येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत किरण भगतवर मात करत अभिजित कटके महाराष्ट्र केसरी झाला होता. तब्बल ३ वर्षांनी महाराष्ट्राला नवा महाराष्ट्र केसरी मिळाला होता.

यापूर्वी २०१४ ते २०१६ असे सलग तीन वेळा जळगावचा विजय चौधरी तर २०११ ते २०१३ असे सलग तीन वर्ष नरसिंग यादव महाराष्ट्र केसरी जिंकत आले होते. गेल्या ७ वर्षात केवळ ३ महाराष्ट्र केसरी झाले आहेत हे विशेष. याच ७ वर्षात पुणे शहर आणि जिल्ह्यात ७पैकी ३वेळा ही स्पर्धा झाली परंतु पुणेकर मल्लाला पहिल्यांदाच या काळात ही स्पर्धा २०१७मध्ये जिंकता आली आहे.

क्रीडा पत्रकार आणि कुस्ती अभ्यासक संजय दुधाने यांच्या ‘महाराष्ट्र केसरी यशोगाथा’ पुस्तकातील माहितीप्रमाणे ७वेळा पुणेकर मल्लांना ही स्पर्धा जिंकता आली आहे तर विक्रमी १६वेळा कोल्हापूर आणि ६वेळा मुंबईकर मल्लांना ही स्पर्धा जिंकली आहे.

१९६१पासून आजपर्यंत ही स्पर्धा दोन वेळा (१९६३ आणि १९९६) रद्द करण्यात आली होती तर ४वेळा ही स्पर्धा अनिर्णित राहिली. ही स्पर्धा विक्रमी ११ वेळा आयोजित करण्याचा मान पुणे जिल्ह्याला मिळाला आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची आजपर्यंतची ठिकाणे व विजेते

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची आजपर्यंतची ठिकाणे व विजेते

१९५३- पुणे
१९५५- मुंबई- स्पर्धा रद्द
१९५९- सोलापूर-

१९६०- नागपुर- अनिर्णित
१९६१- औरंगाबाद- दिनकर दहय़ारी
१९६२- धुळे- भगवान मोरे
१९६३- सातारा- स्पर्धा रद्द
१९६४- अमरावती- गणपत खेडकर
१९६५- नाशिक- गणपत खेडकर
१९६६- जळगाव- दिनानाथ सिंह
१९६७- खामगाव, बुलढाणा- चंबा मुतनाळ
१९६८- अहमदनगर- चंबा मुतनाळ
१९६९- लातूर- हरिश्चंद्र बिराजदार

१९७०- पुणे- दादू चौगुले
१९७१- अलिबाग, रायगड- दादू चौगुले
१९७२- कोल्हापूर- लक्ष्मण वडार
१९७३- अकोला- लक्ष्मण वडार
१९७४- ठाणे- युवराज पाटील
१९७५- चंद्रपूर- रघुनाथ पवार
१९७६- अकलूज, सोलापूर- हिरामण बनकर
१९७७- चाळीसगाव, जळगाव- अनिर्णित
१९७८- मुंबई- आप्पासाहेब कदम
१९७९- नाशिक- शिवाजीराव पाचपुते

१९८०- खोपोली, रायगड- इस्माईल शेख
१९८१- नागपुर- बापू लोखंडे
१९८२- बीड- संभाजी पाटील
१९८३- पुणे- सरदार खुशहाल
१९८४- सांगली- नामदेव मोळे
१९८५- पिंपरी चिंचवड, पुणे- विष्णु जोशीलकर
१९८६- सोलापूर- गुलाब बर्डे
१९८७- नागपुर- तानाजी बनकर
१९८८- अहमदनगर- रावसाहेब मगर
१९८९- वर्धा- अनिर्णित

१९९०- कोल्हापूर- अनिर्णित
१९९१- अमरावती- अनिर्णित
१९९२- पुणे- आप्पालाल शेख
१९९३- बालेवाडी, पुणे- उदयराज जाधव
१९९४- अकोला- संजय पाटील
१९९५- नाशिक- शिवाजी केकान
१९९६- स्पर्धा रद्द
१९९७- देवळी, वर्धा- अशोक शिर्के
१९९८- नागपुर- गोरखनाथ सरक
१९९९- पुणे-  धनाजी फडतरे

२०००- खामगाव, बुलढाणा- विनोद चौगुले
२००१- नांदेड- राहुल काळभोर
२००२- जालना- मुन्नालाल शेख
२००३- यवतमाळ- दत्तात्रय गायकवाड
२००४- वाशी- चंद्रहास निमगिरे
२००५- इंदापूर, पुणे- सईद चाउस
२००६- बारामती, पुणे- अमोल बुचडे
२००७- औरंगाबाद- चंद्रहार पाटील
२००८- सांगली- चंद्रहार पाटील
२००९- सांगवी, पुणे- विकी बनकर

२०१०- रोहा, रायगड- समाधान घोडके
२०११- अकलूज, सोलापूर- नरसिंग यादव
२०१२- गोंदिया- नरसिंग यादव
२०१३- भोसरी- नरसिंग यादव
२०१४- अहमदनगर- विजय चौधरी
२०१५- नागपुर- विजय चौधरी
२०१६- वारजे, पुणे- विजय चौधरी
२०१७-भुगाव, पुणे- अभिजीत कटके
२०१८- जालना- बाला रफिक शेख
२०१९- बालेवाडी, पुणे-

महत्त्वाच्या बातम्या:

महाराष्ट्र केसरी यशोगाथा भाग १- सुरू झाले नवे कुस्तीपर्व

महाराष्ट्र केसरी यशोगाथा २- कुस्तीगीरांचा कुुंभमेळ्यात डंका लालमातीचाही

महाराष्ट्र केसरी यशोगाथा ३- उत्तरोत्तर रंगणारा कुस्ती सोहळा

महाराष्ट्र केसरी यशोगाथा ४- अबब! ६०० लढती १२४ पंच अन् चमचमणारी गदा

२०१८च्या महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी

You might also like