इस्लामपूर, सांगली येथे जयंत पाटील खुले नाट्यगृहाच्या मैदानावर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेत महिलां विभागात मुंबई शहर विरुद्ध रत्नागिरी यांच्यात अंतिम सामना रंगला. महिला विभागात दबदबा असलेले पुणे, मुंबई उपनगर दोन्ही बलाढ्य संघ बादफेरीत पराभूत झाले.
मुंबई शहर विरुद्ध रत्नागिरी अंतिम सामन्यात मुंबई शहर ने सुरुवाती पासून आक्रमक पवित्रा घेत सामन्यावर पकड मिळवली. मध्यंतरा पर्यत १५-०४ अशी भक्कम आघाडी मुंबई शहर कडे होती. क्षितिजा हिरवे व पूजा यादव यांनी चढाईत चांगला खेळ केला. तर पकडी मध्ये साक्षी रहाटे चमकली.
रत्नागिरी कडून चढाईत श्रद्धा पवार व सिमरन यांनी मुंबई शहर ला प्रतिउत्तर देण्याचा चांगला प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आले. मुंबई शहर ने ३१-१७ असा सामना जिंकत विजेतेपद पटाकवले.
पुरुष विभागात मुंबई शहर विरुद्ध ठाणे यांच्यात झालेल्या अंतिम सामना मुंबई शहर ने सुरुवाती पासून जोरात खेळ करत भक्कम आघाडी मिळवली. ठाणे च्या हुकमी चढाईपटू महेश मोडकरच्या ४ वेळा पकडी करण्यात मुंबई शहर ला यश आले. पकडी मध्ये संतोष वारीक व संकेत ने चांगल्या पकडी केल्या. मध्यंतरा पर्यत मुंबई शहर कडे १८-१० अशी आघाडी होती.
मध्यंतरानंतर ही मुंबई शहर ने सांघिक खेळ करत आघाडी वाढवली. एकवेळ १६-३२ असा पिछाडीवर असलेला ठाणे संघाने २९-३४ अशी सामन्यात चुरस वाढवली. महेश मोडकर ने सुपर रेड ने ठाणे सामन्यांत परत आला. पण मुंबई ने वेळ काढत आपली आघाडी कायम ठेवली. पंकज मोहिते व अजिंक्य कापरे यांनी चढाईत चांगला खेळ केला. मुंबई शहर ने ३४-३१ असा विजय मिळवत छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेचं विजेतेपद पटकावले.
स्पर्धेचा अंतिम निकाल
महिला विभाग
विजतेपद – मुंबई शहर
उपविजेतेपद – रत्नागिरी
पुरुष विभाग
विजेतेपद – मुंबई शहर
उपविजेतेपद – ठाणे