भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आजपासून अधिकृतपणे पदभार स्वीकारला. भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत या दोघांनी अनेक प्रश्नांची उत्तर दिली.
शुबमन गिलला उपकर्णधार का बनवण्यात आलं?
या प्रश्नावर उत्तर देताना आगरकर म्हणाले, “शुबमन गिल हा तिन्ही फॉरमॅटचा खेळाडू आहे. त्यानं मागील एका वर्षात चांगली कामगिरी केली आहे. त्यानं नेतृत्व करतानाही चांगली चुणूक दाखवली. आम्ही त्याला अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र याची काही गॅरंटी नाही.”
रवींद्र जडेजाला ड्रॉप केलं का?
टी20 मधून निवृत्ती घेतलेल्या रवींद्र जडेजाला एकदिवसीय संघात स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे त्याला ड्रॉप करण्यात आलं का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर उत्तर देताना आगरकर म्हणाले, “अक्षर आणि जडेजा या दोघांनाही निवडण्यात काही अर्थ नव्हता. एखाद्याला बेंचवर बसाव लागलं असतं. जडेजाला वगळण्यात आलेलं नाही. मोठा कसोटी हंगाम येणार आहे”.
वर्कलोड मॅनेजमेंट
वर्कलोड मॅनेजमेंटवर बोलताना अजित आगरकर म्हणाले, “गोलंदाज म्हणून बुमराहसाठी वर्कलोड मॅनेजमेंट योग्य आहे. मात्र फलंदाज जर लयीत असेल तर त्यानं सर्व सामने खेळले पाहिजे. बुमराह खास आहे आणि त्याचा जपणं गरजेचं आहे. फक्त बुमराहच नाही, तर सर्व वेगवान गोलंदाजाचं वर्कलोड मॅनेजमेंट पाहिलं जाईल.”
रिषभ पंतबाबत बोलताना आगरकर म्हणाले, पंत बऱ्याच काळानंतर संघात परततोय. आम्हाला त्याला कोणत्याही दडपणाशिवाय संघात स्थान द्यायचं होतं. केएल राहुल बऱ्याच काळापासून टी20 संघाच्या बाहेर आहे. रोहित खेळत होता, त्यामुळे चिंता नव्हती. शुबमन आता तिन्ही फॉरमॅटचा खेळाडू आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
‘सुर्यकुमारलाच कर्णधार का बनवले?’, आगरकर म्हणाला; हार्दिकचा एक प्रॅाब्लेम आहे….
‘ऋतुराज गायकवाडला का वगळले?’, आगरकर म्हणतोय; आम्ही…..
‘मी नेहमीच त्याचा चाहता असेन’, टीम इंडियाच्या माजी कर्णधारासाठी शिवम दुबे स्पष्टच बोलला..