भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी निवड समीतीच्या सदस्यांवर होणाऱ्या कमी अनुभवाच्या टीकेवर उत्तर देताना म्हटले आहे की जास्त क्रिकेट खेळले म्हणजे तूम्हाला जास्त माहिती असते, या गोष्टीवर त्यांचा विश्वास नाही.
मागील काही दिवसांपासून निवड समीती सदस्यांच्या अनुभवाबद्दल टीका होत आहे. या सदस्यांनी मिळून केवळ 13 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामुळे या टीका होत आहेत. भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही निवड समीतीवर टीका केली आहे.
या विषयावर प्रसाद यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे. त्यांना ज्यावेळी निवड समीतीवर होणाऱ्या टीकेबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, ‘मी तूम्हाला सांगतो की निवड समीतीमध्ये असणारे सर्व सदस्यांनी भारतासाठी वेगवेगळ्या प्रकारात खेळले आहेत, जो आमच्या नियुक्तीच्या वेळी मूलभूत निकष आहे.’
‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त आम्ही मिळून 477 प्रथम श्रेणीचे सामने खेळले आहेत. आमच्या कार्यकाळात 200 पेक्षा जास्त प्रथम श्रेणीचे सामने पाहिले आहेत. हे आकडे बघितल्यानंतर तूम्हाला असे वाटते का खेळाडू आणि चयनकर्ता म्हणून आमचा अनुभवामध्ये कौशल्य ओळखण्याची क्षमता नाही.’
तसेच निवड समीती सदस्यांनी केवळ 13 कसोटी सामने खेळण्याबद्दल प्रसाद म्हणाले, ‘जर कोणी आंतरराष्ट्रीय अनुभवाबद्दल बोलत असेल, तर एड स्मिथ जे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत त्यांनी केवळ 1 कसोटी सामना खेळला आहे.’
‘ट्रेवर हॉन्स जे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निवड समीतीचे अध्यक्ष आहेत त्यांनी केवळ 7 कसोटी सामने खेळले आहेत आणि हा मार्क वॉ, जे 128 कसोटी आणि 244 वनडे सामने खेळले आहेत त्यांनी ट्रेवर यांच्या हाताखाली काम केले आहे.
‘ऑस्ट्रेलियाचे दिग्गज माजी खेळाडू आणि कर्णधार ग्रेग चॅपेल, जे 87 कसोटी सामने आणि 74 वनडे खेळले आहेत, ते आत्ता ट्रेवर यांच्या हाताखाली काम करत आहेत.’
या देशांच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय अनुभव हा मुद्दा कधीही मोठा होत नाही. मग आपल्या देशात ह मुद्दा कसा काय येतो. मी फक्त हे म्हणू इच्छितो की प्रत्येक कामाची गरज वेगळी असते.’
‘जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठ्या अनुभवाचा प्रश्न आहे तर कै. श्री राज सिंग दुंगारपूर कधीही वरिष्ठ निवड समीतीचे अध्यक्ष झाले नसते. कारण त्यांनी कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही. कदाचित सचिन तेंडुलकर 16 व्या वर्षी क्रिकेट खेळू शकला नसता.’
‘तसेच जर आंतरराष्ट्रीय अनुभवाची गोष्ट आहे तर अनेक माजी क्रिकेटपटू ज्यांनी प्रथम श्रेणीचे खूप सामने खेळले आहेत. ते कधीही भारताचे निवडकर्ते बनण्याचे स्वप्न बघू शकले नसते. जेव्हा निवड समीतीचे काम हे वेगवेगळी प्रतिभा शोधण्याचे आहे तर मग त्यांच्या आंतरराष्ट्रीय अनुभवाबद्दल प्रतिक्रिया देणे किती योग्य आहे?’
महत्त्वाच्या बातम्या –
–८ महिन्यांच्या निलंबणाबाबत पृथ्वी शॉने दिली ही प्रतिक्रीया
–तो खेळाडू ९ वर्षापूर्वी करत होता हे काम, आता ऍशेसमध्ये पदार्पण करण्यासाठी आहे सज्ज
–पहा व्हिडीओ- तेव्हा कपिलने ४ चेंडूत ४ षटकार ठोकून फॉलो-ऑन वाचवला होता!