क्रिकेटचा सध्या जगभर वेगाने प्रसार होत आहे. अनेक मोठे देशही क्रिकेटच्या या खेळात सामील होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेला भारताचा शेजारी चीनही आता या दिशेने सरसावला आहे. चीनमध्ये क्रिकेटला सुरुवात झाली असली तरी, त्यात चांगले भविष्य घडवण्यासाठी त्यांना खूप मोठे काम करण्याची गरज आहे. चीनमधील क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी चीनमधील एका संघाने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या (कॅब) अध्यक्षांची भेट घेतली आहे. या संघाने कॅबकडे चीनमधील क्रिकेटला पाठिंबा देण्याची मागणी केली.
चीनमधील तीन सदस्यीय संघाने कॅबचे अध्यक्ष अविषेक दालमिया यांची भेट घेऊन आपला प्रस्ताव दिला. सोबतच बंगाल आणि चीन यांच्यातील क्रिकेट संबंध वाढवण्याचा मानसही व्यक्त केला.
दालमिया यांनी याबाबत माहिती देताना म्हटले,
“चीनमधील एक शिष्टमंडळ आम्हाला भेटण्यासाठी आले होते. चीनमध्ये क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी त्यांना आमची मदत हवी आहे. आम्ही यापूर्वी देखील भूतान व बांगलादेश क्रिकेटला मदत केली होती. चीनला त्यांच्या युवा खेळाडूंना चांगले प्रशिक्षण द्यायचे आहे. युवा संघाचे काही प्रदर्शनीय सामने त्यांना आमच्यासोबत खेळायचे आहेत.”
चीन क्रिकेट संघाला २००४ मध्ये आयसीसीने मान्यता दिली होती. २०१७ मध्ये त्यांना सहयोगी सदस्य बनवण्यात आले आहे. २००९ मध्ये चीनने पहिला आंतरराष्ट्रीय सामना इराणविरुद्ध खेळलेला. एप्रिल २०१८ मध्ये, आयसीसीने सर्व सदस्यांना पूर्ण टी२० संघाचा दर्जा दिला आहे. १८५८ ते १९४८ दरम्यान, चीनचा सर्वात मोठा क्लब शांघाय क्रिकेट क्लब अनेक संघांविरुद्ध सामने खेळलेला. आता चीनच्या नऊ शहरांमध्ये क्रिकेट खेळले जाते. दीडशेहून अधिक शाळांनीही यात सहभाग घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-पाकिस्तान महामुकाबल्यात ‘या’ पाच जणांत रंगणार ‘बॅटिंग बॅटल’
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज ब्रेट ली म्हणतोय, ‘मला रिषभ पंतला गोलंदाजी करायचीये!’
फलंदाजांना सळो की पळो करून सोडायला एशियातील सर्वोत्तम ५ गोलंदाज सज्ज, वाचा संपूर्ण यादी