2024 ऑलिम्पिक गेम्स पॅरिस मध्ये होत आहेत. पॅरिसला ‘प्रेमाचं शहर’ म्हटलं जातं. अनेक जण खास या शहरात येऊन आपल्या जोडीदाराकडे प्रेम व्यक्त करतात. सध्या जारी ऑलिम्पिकमध्ये देखील असंच दृष्य पाहायला मिळालं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेती चीनची बॅडमिंटनपटू हुआंग या किओंग हिला तिचा प्रियकर लियू यू चेननं प्रपोज केलं, जे आता चर्चेचा विषय बनलं आहे.
शुक्रवारी (02 ऑगस्ट) चीनच्या हुआंग या किओंगनं बॅडमिंटनच्या मिश्र सांघिक स्पर्धेत झेंग सिवेईसह सुवर्णपदक जिंकलं. या विजयानंतर हुआंग या किओंगला तिचा प्रियकर लियू युचेननं प्रपोज केलं. त्याचा प्रपोज करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये दिसतंय की, लियू युचेन प्रथम त्याचा जोडीदार हुआंग या किओंगला पुष्पगुच्छ देतो. नंतर तो त्याच्या गुडघ्यावर बसतो आणि अंगठीसह तिला प्रपोज करतो. हुआंग या किओंग हे प्रपोज नाकारूच शकत नाही. प्रियकरानं प्रपोज केल्यानंतर तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात. त्यानंतर ती अंगठी घालते आणि लिऊ युचेनला मिठी मारते.
लियू युचेननं प्रपोज केल्यानंतर हुआंग या किओंगला मोठा धक्का बसल्याचं दिसतं आहे. तिला अशा प्रकारच्या प्रपोजची अपेक्षा नव्हती. हुआंग म्हणाली, “असं प्रपोज माझ्यासाठी आश्चर्यकारक होतं, कारण मी माझ्या तयारीवर लक्ष केंद्रित करत होते. मी ऑलिम्पिक चॅम्पियन आहे आणि मला लग्नाचा प्रस्ताव आला जो अपेक्षित नव्हता. तुम्ही या घटनेचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
View this post on Instagram
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चीनच्या हुआंग या किओंग आणि झेंग सिवेई यांच्या मिश्र जोडीनं सुवर्णपदक जिंकलं. त्यांनी अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाच्या किम वोन हो आणि जेओंग ना युन यांचा 21-8, 21-11 असा पराभव केला.
हेही वाचा –
लक्ष्य सेनची ‘लक्षवेधी’ कामगिरी, ऑलिम्पिकच्या 128 वर्षांच्या इतिहासात असं करणारा पहिलाच भारतीय!
सरकारचा निर्दयीपणा! ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या प्रशिक्षकाचं घर पाडलं जाणार
चक दे इंडिया! तब्बल 52 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलिया भारताकडून चारीमुंड्या चीत